रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
गडकरी यांच्या हस्ते त्रिपुरा येथे 9 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचा पायाभरणी समारंभ
मंत्री म्हणाले, प्रकल्पामुळे या भागातील सामाजिक – आर्थिक परिस्थितीला चालना मिळेल
या प्रदेशाच्या पर्यटन, आर्थिक आणि आंतरराष्ट्रीय दळणवळण विकासात लक्षणीय वाढ होईल
Posted On:
27 OCT 2020 6:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर 2020
केंद्रिय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी आभासी माध्यमातून त्रिपुरा येथे 9 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचा पायाभरणी समारंभ केला, ज्या मार्गांची एकूण लांबी जवळपास 262 किलोमीटर असून त्यासाठी 2752 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
समारंभाच्या अध्यक्षस्थानी त्रिपुराचे मुख्यमंत्री श्री बिप्लव कुमार देव होते, केंद्रिय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग आणि जनरल (निवृत्त) डॉ. व्ही. के. सिंग, राज्यातील अन्य मंत्री, संसद सदस्य, आमदार आणि केंद्र तसेच राज्यामधील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
समारंभानिमित्त बोलताना, केंद्रिय मंत्री म्हणाले, गेल्या सहा वर्षांत त्रिपुरामध्ये जवळपास 300 किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग जोडले गेले आहेत. आज, राज्यात 850 किलोमीटर पेक्षा अधिक लांबीचे राष्ट्रीय महामार्ग आहेत. त्रिपुरामध्ये 8,000 कोटी रुपये खर्चून रस्ते बांधणी होत असल्याची माहिती त्यांनी दिली आणि सन 2015 आणि 2020 दरम्यान भूसंपादन खर्चासाठी तब्बल 365 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. ते म्हणाले की, राष्ट्रीय महामार्गांच्या श्रेणीसुधारणा आणि विकासामुळे सर्व जिल्हे आणि मोठ्या शहरांमध्ये दळणवळण सुधारणा होईल.
गडकरी म्हणाले की, लवकरच राज्यामध्ये दोन महत्त्वपूर्ण प्रकल्प पूर्ण होणार आहेत. फेनी पूल आणि उदयपूर – अगरतला रस्ता हे ते प्रकल्प आहेत. दोन किलोमीटर दुपदरी पेव्ह्ड शोल्डर उदयपूर – अगरतला रस्ता साधारण 750 कोटी रुपयांचा हा प्रकल्प पुढच्या महिन्यात पूर्ण होत आहे. भारताच्या हद्दीत सबरम आणि बांग्लादेशच्या हद्दीत रामगड यांच्यामध्ये असलेला 1.8 किलोमीटर लांबीचा फेनी पूल 129 कोटी रुपये खर्चाचा आहे, जो या वर्षी डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे. ते म्हणाले की, सामाजिक, आर्थिक आणि संरक्षक मुद्द्यांच्या दृष्टीने, या पुलाचे महत्त्व अधिक आहे. सबरम आणि चितगाँगमधील अंतर 75 किलोमीटरचे आहे, आणि या पुलामुळे चितगांव आणि कोलकाता बंदरांवरील वाहतुक सोपी होईल. सबरम जवळ एकीकृत तपासणी चौकी प्रस्तावित आहे.
मंत्री म्हणाले, फेनी नदीवरील आरसीसी पद्धतीच्या पुलाच्या बांधकामामुळे बांग्लादेशासह आंतरराष्ट्रीय सीमेवरील संपर्क सुधारला जाईल. अगरतला शहराच्या पश्चिमेस चौपदरीकरणाचा बायपास (पर्यायी मार्ग) डीपीआरच्या तयारीखाली आहे. यामुळे त्रिपुरा राज्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 8 ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 108 बी यांच्यातील संपर्क (दळणवळण) आणखी सुधारला जाईल, अगरतला शहरातील वाहतुकीची कोंडी कमी होईल आणि विमानतळापासून माताबारीला जोडले जाईल. अगरतला शहराचे आसाम सीमेपर्यंत राष्ट्रीय महामार्ग 108 बी, 208 आणि 208 ए मार्गे असलेले दळणवळण कमी लांबीच्या मार्गाचे असेल. अगरतला ते खोवई (राष्ट्रीय महामार्ग 108 बी) आणि कैला शहर ते आसाम सीमारेषा (राष्ट्रीय महामार्ग 208 ए) यांचे श्रेणीसुधारणा काम यापूर्वीच गौरविले गेले आहे आणि शिल्लक विभागात कैलाशहर ते खोवई (राष्ट्रीय महामार्ग 208) यातील श्रेणीसुधार जेआयसीए निधी अंतर्गत प्रस्तावित आहे. या विभागासाठी निविदा आधीच प्राप्त झाल्या आहेत आणि लवकरच कामांना प्रारंभ होण्याची शक्यता आहे. त्यांनी नमूद केले की, अगरतला ते चुरायबरी राष्ट्रीय महामार्ग – 08 – त्रिपुराची जीवनवाहिनी असलेल्या मार्गाचे चौपदीकरण डीपीआर अंतर्गत आहे, जे आसाम आणि अगरतलासह अन्य राज्यांमध्ये वेगवान आणि विना अडथळा आंतरराज्य संपर्क निर्माण करेल.
मंत्र्यांनी सांगितले की, राज्यासाठी 367 किलोमीटर लांबीचा साधारण 7523 कोटी रुपये खर्चाचे चार प्रकल्पांचे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार होण्याच्या प्रक्रियेत आहेत. ते म्हणाले, सीआरआयएफ अंतर्गत राज्याला 11 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे, आणि उर्वरित 20 कोटी रुपयांचा निधी त्रिपुराकडून उपयोग्यता प्रमाणपत्र मिळाल्यानंतर दिला जाईल.
त्रिपुराचे वर्णन करताना केंद्र सरकारचे “अक्ट ईस्ट पॉलिसी”चे प्रवेशद्वार असे संबोधन करताना, केंद्रिय सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन अणुऊर्जा विभाग आणि अवकाश विभाग राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग म्हणाले की, त्रिपुराहून बांग्लादेशला जाणार्या एका नवीन रेल्वेची ओळख आम्ही लवकरच करुन एक नवा अध्याय निर्माण करणार आहोत आणि संपूर्ण प्रदेशाला समुद्रमार्गापर्यंत प्रवेश देऊन या क्षेत्राच्या विकाचे नवे चित्र निर्माण करणार आहोत. ते पुढे म्हणाले की यामुळे सीमा ओलांडून विशेषतः आपल्या पूर्वेकडील शेजारी राज्यांच्या सीमेवरील व्यापाराला प्रोत्साहन मिळेल.
B.Gokhale/S.Shaikh/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1667891)
Visitor Counter : 137