विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

नव्या सॅनीटायझर आणि जंतुनाशकामुळे रसायनयुक्त जंतूनाशकाच्या दुष्परीणामापासून दिलासा

Posted On: 26 OCT 2020 5:51PM by PIB Mumbai

 

 कोविड-19 चा संसर्ग रोखण्यासाठीचा एक उपाय म्हणून वारंवार हात धुताना  रसायन युक्त साबण आणि जंतुनाशकाचा वापर केल्याने कोरडे होणारे हात आणि हाताला येणारी खाज यापासून आता लवकरच सुटका होणार आहे. देशाच्या अनेक भागातले स्टार्ट अप आता रसायन युक्त जंतुनाशकाला टिकाऊ पर्याय आणण्यासाठी सरसावले आहेत.

रुग्णालयात निर्माण झालेला जैव कचरा  निर्जंतुक करणे आणि दीर्घ काळ आणि सुरक्षित निर्जंतुकीकरण यासाठी नॅनो मटेरियलचा कल्पक वापर आणि रासायनिक प्रक्रिया नवोन्मेश यांचा समावेश आहे.

 

                                          

सुरक्षित निर्जंतुकीकरण आणि स्वच्छता तंत्रज्ञान एकूण 10 कंपन्यांकडून आले असून त्याला  कोरोनाविरोधातल्या लढ्यामध्ये भर घालून  बळ देणारे केंद्रकवच,विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, आयआयटी बॉम्बे यांचे सहकार्य लाभले आहे.

मुंबई स्थित इन्फ्लोक्स वाटर सिस्टीम या अतिशय प्रदूषित पाणी आणि सांडपाणी यावर प्रक्रिया करण्यामध्ये काम करणाऱ्या  स्टार्ट अपने कोरोना विरोधातल्या लढ्यासाठी आपल्या तंत्रज्ञानात सुधारणा करत जागा आणि साधने निर्जंतुक करण्यासाठी वज्र ही यंत्रणा आरेखित आणि विकसित केली आहे. वज्र केई  या  श्रेणीमधल्या  निर्जंतुक यंत्रणेत बहु स्तरीय निर्जंतुकीकरण प्रक्रिया असून त्यामध्ये ओझोन निर्मिती आणि युव्हीसी लाईट  स्पेक्ट्रमचा निर्जंतुकीकरण प्रभाव निर्माण केला जातो. पीपीई वर असणाऱ्या विषाणू, जीवाणू आणि इतर सूक्ष्मजीव निष्प्रभ करण्यासाठी या मध्ये प्रगत ऑक्सिडेशन, इलेक्ट्रोस्टाटीक डिस्चार्ज, युव्हीसी लाईट  स्पेक्ट्रमचा वापर करण्यात आला आहे. यामुळे पीपीई, वैद्यकीय आणि अ वैद्यकीय उपकरणे पुन्हा वापरता येणे शक्य असल्यामुळे पैशाची बचत होते.

 

      

इन्फ्लोक्स वाटर सिस्टीमने जल क्षेत्रात नवोन्मेशासाठी आयआयटी बॉम्बे मार्फत विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाकडून निधी प्रयास अनुदानासह सुरवात केली असून कोविड-19 विरोधातल्या लढ्यासाठी आपल्या तंत्रज्ञानात सुधारणा करण्यासाठी त्यांनी कवच निधी वापरला आहे. महिन्याला 25 निर्जंतुकीकरण यंत्रणा निर्मितीसाठी ते सज्ज झाले असून त्यानंतर दरमहा उत्पादन क्षमतेत  25 % वाढ करण्याच्या दृष्टीने उत्पादन,पुरवठा साखळी आणि लॉजिस्टिक सज्ज करण्यात येत आहे.  

 

M.Iyengar/N.Chitale/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1667610) Visitor Counter : 1105