ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
2020-21 च्या खरीप विपणन हंगामात किमान आधारभूत किंमतीनुसार खरेदी सुरु
Posted On:
24 OCT 2020 6:23PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 ऑक्टोबर 2020
केंद्र सरकार गेल्या हंगामाप्रमाणेच 2020-21 च्या खरीप पिकांची, सध्याच्या किमान आधारभूत किंमतीनुसार खरेदी करत आहे.
मागील वर्षाच्या 109.54 लाख मेट्रिक टन च्या तुलनेत 23.10.2020 पर्यंत 135.72 लाख मेट्रिक टन खरेदीसह पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, तामिळनाडू , उत्तराखंड, चंदीगड , जम्मू-काश्मीर, गुजरात व केरळ या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात खरीप 2020-21साठी धान खरेदीचा वेग चांगला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ही वाढ 23.91 टक्के आहे. एकूण 135.72 लाख मेट्रिक टन खरेदीपैकी एकट्या पंजाबने 88.44 लाख मे.टन.चे योगदान दिले असून ते एकूण खरेदीच्या 65.16 टक्के आहे. सुमारे 11.57 लाख शेतकऱ्यांना सध्या सुरू असलेल्या केएमएस खरेदीचा लाभ मिळाला आहे, ज्याचे एमएसपी मूल्य 18880 रुपये प्रति मेट्रिक टन एमएसपी दराने 25625.29 कोटी रुपये आहे.
राज्यांकडून आलेल्या प्रस्तावानुसार, 2020 खरीप विपणन हंगामासाठी तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र,तेलंगण, गुजरात,उत्तर प्रदेश, हरियाणा, ओडिशा, राजस्थान आणि आंध्रप्रदेश या राज्यांसाठी 45.10 लाख मेट्रिक टन डाळी आणि तेलबियांच्या समर्थन मुल्यानुसार खरेदीला मंजुरी देण्यात आली आहे. याशिवाय 1.23 लाख मेट्रिक टन खोबरे खरेदीला आंध्रप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळसाठी मंजुरी देण्यात आली आहे.
23.10.2020, पर्यंत सरकारने आपल्या नोडल संस्थाच्या मदतीने तामिळनाडू, महाराष्ट्र आणि हरियाणा या राज्यांकडून 6.43 कोटी रुपये किंमतीच्या मूग आणि उडदाची 871 शेतकऱ्यांकडून खरेदी केली आहे. त्याचप्रमाणे किमान आधारभूत किंमत 52.40 कोटी रुपये असलेल्या 5089 मेट्रिक टन खोबऱ्याची खरेदी करण्यात आली त्याचा कर्नाटक आणि तामिळनाडू मधल्या 3961 शेतकऱ्यांना लाभ झाला. खोबरे आणि उडीदाच्या खरेदीबाबत, या पिकांचे उत्पादन होणाऱ्या बहुतांश राज्यात, सध्या बाजारभाव किमान आधारभूत किंमतीपेक्षा अधिक आहेत. खरीप हंगामातील डाळी आणि तेलबियांच्या खरेदीबाबत संबंधित राज्ये/केंद्रशासित प्रदेश, निश्चित केलेल्या तारखेपासून खरेदी करण्याची तयारी करत आहेत.
किमान आधारभूत किंमतीनुसार पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि मध्य प्रदेशात कापूस खरेदी सुरळीत सुरु आहे. 23.10.2020 पर्यंत 95,786.08 लाख रुपये मूल्याच्या 3,339,143 गासड्या कापसाची खरेदी करण्यात आली असून याचा 66,052 शेतकऱ्यांना लाभ झाला.
B.Gokhale/S.Tupe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1667347)
Visitor Counter : 150