भूविज्ञान मंत्रालय

भारतीय हवामान विभागाने दक्षिण आशियासाठी  महापूर मार्गदर्शन सेवाप्रणाली केली नियुक्त

Posted On: 23 OCT 2020 9:52PM by PIB Mumbai

 

भारतीय पृथ्वी--विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम.राजीवन यांनी दिनांक 22 ऑक्टोबर 2020 रोजी दक्षिण आशियाई देशांसाठी आवश्यक अशा प्रकारची पहिलीच महापूर मार्गदर्शक सेवाप्रणाली, भारत, बांग्लादेश, भूतान, नेपाळ, आणि श्रीलंका या दक्षिण आशियाई देशांसाठी समर्पित केली. आभासी पध्दतीने झालेल्या या उद्घाटन समारंभाला जागतिक हवामान संस्थेचे भूजलविज्ञान आणि जलस्रोत सेवा विभाग  प्रमुख. डॉ.हिर्विन किम , भूजलविज्ञान संशोधन संस्था यू.एस.ए.चे संचालक डॉ.काँन्स्टंटाईन पी.जाँर्जकाकोस, राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य सचिव, भाप्रसे, श्री. जी.व्ही.व्ही.सरमा , केंद्रीय जल आयोगाचे  अध्यक्ष डॉ. राजेंद्र कुमार जैन, तसेच हवामान विभागाचे  महासंचालक  आणि जागतिक हवामान संस्थेचे आजीव प्रतिनिधी यांच्यासह अनेक  देशातील तसेच परदेशातील सन्माननीय सदस्य उपस्थित होते.

 आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. एम.राजीवन यांनी  पाऊस अंदाज   निरिक्षण आणि भूजल ओलावा यांची कार्यक्षमता प्रणाली सुधारण्याची गरज असल्याचे नमूद केले.प्रसाराची अशी  स्वयंचलित पध्दत प्रस्थापित करायला हवी, जेणेकरुन सामाजिक माध्यमांद्वारे सर्व सहभागी संस्थांसह आपत्कालीन अधिकाऱ्यांपर्यंत वेळेवर माहिती पोहोचेल.विभागीय आणि आंतरराष्ट्रीय समन्वय साधून सदस्य देशांत माहितीचे आदानप्रदान , तज्ञांचा सल्ला,विकास,प्रदेशातील सेवा सुरू ठेवण्यासाठी भूजलविज्ञान संशोधन केंद्र आणि जागतिक हवामान संस्था यांचे सबलीकरण व्हायला हवे, असे डॉ. राजीवन यांनी स्पष्ट केले.  

भारतीय हवामान विभागाचे महासंचालक आणि जागतिक हवामान संस्थेचे भारतातील सदस्य डॉ. एम.मोहपात्रा यांनी आपल्या भाषणात या प्रणालीच्या  उल्लेखनीय वैशिष्ट्यांवर प्रकाश टाकला आणि  भूजलविज्ञान या क्षेत्रातील धोक्यांचा अंदाज व्यक्त करण्यासाठी  सहचर्याने  केलेल्या क्षमता विस्ताराच्या  कार्याची प्रशंसा केली.

त्यांनी  दक्षिण आशियाई देशांना महापूराचा धोका  (6तास आधी),आणि जोखीम  (24तास आधी) सांगण्यासाठी विभागीय केंद्राद्वारे राष्ट्रीय हवामान आणि भूजलविज्ञान सेवा संस्थांना मार्गदर्शन केले जाईल असे सांगितले   यामुळे ,राष्ट्रीय आणि राज्य आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरण आणि इतर सहभागी संस्थांना  जीवहानी टाळण्याबाबतच्या उपाययोजना करता येतील याबाबत आश्वस्त करण्यात आले. यात भारतासह बांग्लादेश,भूतान, नेपाळ  आणि श्रीलंका या देशांचाही समावेश आहे. यामुळे सदस्य देशांना अचानक येणाऱ्या जोराच्या पावसाचा इशारा  (ढगफुटी ),आणि शहरांतून अचानक तसेच थोड्या कालावधीसाठी  जमा होणारे महापूराचे पाणी यांचा प्रभावीपणे अंदाज देता येणे शक्य होईल.

जगातील विविध देशांमध्ये  महापूराचा अंदाजाच्या  क्षमतेत  सर्वसाधारणपणे कमतरता आहे. महापूराचा अनर्थकारक परिणाम  होऊन  जीवितहानी  आणि मालमत्तेची हानी होते हे ओळखून पंधराव्या जागतिक हवामान संस्था काँग्रेसमधे ( WMO congress)जागतिक हवामान संस्थेची  भूजलविज्ञान परीषद आणि  जागतिक हवामान संस्थेची मूलभूत प्रणाली परीषद आणि  अमेरिकेची  राष्ट्रीय हवामान सेवा ,अमेरिकन जलविज्ञान संशोधन केंद्र(HRC) तसेच आंतरराष्ट्रीय विकासासाठी अमेरीकन एजन्सी/आंतरराष्ट्रीय  विकासासाठी अमेरीकन ऑफिस(USAID/OFDA), यांच्या सहकार्याने व्यापक  जागतिक  महापूर मार्गदर्शक प्रणाली (FFGS) विकसित करायला आणि त्याची अंमलबजावणी करायला  मान्यता दिली होती.

भारतीय हवामान विभागाकडे  उच्चश्रेणीची  संगणकीय क्षमता ,हवामानाचा संख्यात्मक  अंदाज, विशाल निरीक्षण नेटर्वक(जमीन हवा आणि अंतराळ), आंतरराष्ट्रीय ख्यातीची हवामान अंदाज सांगणारी कार्यप्रणाली आहे.यामुळे जागतिक हवामान संस्थेने भारताला दक्षिण आशियाई देशांसाठी महापूर मार्गदर्शक प्रणाली स्थापन करून  त्यासाठी समन्वय, विकास आणि ती कार्यान्वित करण्यासाठी विभागीय केंद्र स्थापन करण्याची  जबाबदारी सोपवली होती.

*****

B.Gokhale/S.Patgaonkar/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1667180) Visitor Counter : 256