रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

नोंदणी दस्तावेजात दिव्यांगजनांच्या मालकीचा समावेश करण्यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने  दुरुस्ती  अधिसूचित केली

Posted On: 23 OCT 2020 5:28PM by PIB Mumbai

 

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दिनांक 22 ऑक्टोबर 2020 रोजी  केंद्रीय मोटर वाहन कायदा 1989 च्या फॉर्म 20 मध्ये दुरुस्तीची अधिसूचना जारी केली आहे . यामुळे त्यांच्या नोंदणीच्या वेळी वाहनांच्या मालकीचे तपशील हस्तगत करणे शक्य होईल.

मंत्रालयाला असे आढळून आले की मोटार वाहनांच्या नोंदणीसाठी आवश्यक असलेल्या सीएमव्हीआरच्या विविध अर्जाअंतर्गत  मालकांचे तपशिल योग्य प्रकारे प्रतिबिंबित होत नाहीत.

या पार्श्वभूमीवर, मालकीचे सविस्तर तपशील मिळवण्यासाठी सीएमव्हीआर 1989 च्या फॉर्म  20 मध्ये पुढील बदल करण्यात आले आहेत : - “4A.  मालकी प्रकार स्वायत्त संस्था केंद्र सरकारच्या चॅरिटेबल ट्रस्ट वाहन चालक प्रशिक्षण दिव्यांगजन (अ ) जीएसटी सवलत घेत असलेले  (ब) जीएसटी सवलत न घेणारे  शैक्षणिक  संस्था फर्म सरकारी कंपनी व्यक्ती स्थानिक प्राधिकरण अनेक मालक इतर पोलीस विभाग राज्य सरकार राज्य  वाहतूक महामंडळ/विभाग".

तसेचमोटार वाहन खरेदी / मालकी / संचालनासाठी सरकारच्या विविध योजनांतर्गत दिव्यांगजनांना (शारीरिकदृष्ट्या अपंग व्यक्तींना) जीएसटी आणि इतर सवलतींचा लाभ देण्यात येत आहे. सीएमव्हीआर 1989 अंतर्गत सध्याच्या तपशिलानुसार, मिळालेल्या मालकीच्या तपशिलात दिव्यांगजनांची माहिती  प्रतिबिंबित होत नाही. त्यामुळे अशा नागरिकांना अवजड उद्योग विभागाच्या आर्थिक प्रोत्साहन योजनेनुसार दिव्यांगजनांना  सरकारी योजनेंतर्गत मिळणार्‍या विविध सुविधांचा योग्य प्रकारे लाभ मिळवणे कठीण झाले आहे. प्रस्तावित सुधारणांमुळे अशा प्रकारच्या मालकीचे तपशील व्यवस्थित प्रतिबिंबित होतील आणि दिव्यांगजन विविध योजनांतर्गत लाभ मिळवू शकतील.

या संदर्भातील सूचना आणि मते 19 ऑगस्ट 2020 रोजी जनतेकडून मागवण्यात आल्या.

 

M.Chopade/S.Kane/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1667063) Visitor Counter : 283