अर्थ मंत्रालय

आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्राकडून रिअल इस्टेट गुंतवणूक ट्रस्ट आणि पायाभूत सुविधा गुंतवणूक ट्रस्ट याविषयी नियमन आराखडा विहित

Posted On: 21 OCT 2020 7:38PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर 2020

आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्राकडून (IFSCA) गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक-सिटी आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र (GIFT IFSC) यामध्ये वित्तीय उत्पादन विकास आणि सेवा विकसित करण्यासाठी रिअल इस्टेट गुंतवणूक ट्रस्टस  (REITs) आणि पायाभूत सुविधा गुंतवणूक ट्रस्टस (InvITs) यांसाठी नियमन आराखडा विहित केला आहे.

IFSCA ने जागतिक सहभागीदार म्हणजे REITs आणि InvITs जीआयएफटी आयएफएससीच्या शेअर बाजारसूचीवरील नोंदीसाठी एफएटीएफ सुसंगत अधिकारक्षेत्र समाविष्ट केले आहे. याव्यतिरिक्त, InvITs ला खासगी नियुक्त्यांद्वारे निधी उभारण्यास परवानगी दिली आहे.

आयएफएससीमध्ये नोंदणीकृत आरईआयटी (REITs) आणि InvITs ना अनुक्रमे रिअल इस्टेट मालमत्ता आणि पायाभूत प्रकल्पांमध्ये आयएफएससी, भारत आणि इतर परदेशी क्षेत्रामध्ये गुंतवणूक करण्याची परवानगी देण्यात आली आहे, जी जागतिक वित्तीय केंद्रांमध्ये प्रदान केलेल्या चौकटीनुसार असेल.

याव्यतिरिक्त, आरईआयटी (REITs) आणि InvITs ना आयएफएससीशिवाय मंजूर अधिकारक्षेत्रात (सध्या युएसए, जपान, दक्षिण कोरिया, प्रवासी ब्रिटिश प्रदेशाशिवाय युनायटेड किंगडम, फ्रान्स, जर्मनी, कॅनडा आणि भारत) किंवा भारताला आयएफएससीच्या स्टॉक एक्सचेंजवर नोंद आणि व्यापाराची परवानगी आहे, यासाठी गृह अधिकारक्षेत्र कायद्याचे पालन करावे लागेल. 

आयएफएससीवर सूची REITs आणि  InvITs ना आयएफएससीच्या स्टॉक एक्सचेंजच्या आवश्यकतांनुसार असेल.

आयएफएससीमधील घटक रिअल इस्टेट आणि पायाभूत सुविधा क्षेत्राच्या आंतरराष्ट्रीय कार्यक्षेत्रातील वाढीचा फायदा घेऊ शकतात.

अधिक तपशील : https://ifsca.gov.in/Circularया संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

 

M.Chopade/S.Thakur/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1666555) Visitor Counter : 183