शिक्षण मंत्रालय
केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या आभासी उपस्थितीत आयआयटी इंदूरचा दीक्षांत समारंभ
शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते आय आय टी इंदूरच्या परिसरातील विविध इमारतींचेही उद्घाटन
Posted On:
19 OCT 2020 9:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 ऑक्टोबर 2020
केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल 'निशंक' यांच्या आभासी उपस्थितीत आय आय टी इंदूरचा आठवा दीक्षांत समारंभ झाला.तसेच, यावेळी पोखरियाल यांच्या हस्ते, केंद्रीय विद्यालयाच्या पाच इमारती, संगणक आणि माहिती तंत्रज्ञान केंद्र, मध्यवर्ती कार्यशाळा, अभिनंदन भवन आणि तक्षशीला व्याख्यान सभागृह संकुल इत्यादी इमारतींचेही उद्घाटन करण्यात आले.
यावेळी पदवी मिळालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पोखरियाल पुढे म्हणाले, की आपण जे ज्ञान मिळवतो, त्याचा समाजाच्या कल्याणासाठी उपयोग करायला हवा. जेव्हा विद्यार्थी आपल्या पुस्तकी ज्ञानाचा वापर प्रत्यक्ष व्यवहारात करण्याची सुरुवात करतात, तेव्हा त्यांची खरी परीक्षा सुरु होते, असे शिक्षण मंत्री म्हणाले. हे सर्व यशस्वी विद्यार्थी आपापल्या आयुष्यात प्रगती करतील आणि ज्ञानार्जित भारताचे दूत म्हणून जगभर आपल्या ज्ञानाचा उपयोग करतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
संशोधन क्षेत्रात आयआय टी इंदूर ची कामगिरी कौतुकास्पद असून, 2740 संशोधन प्रबंध, तसेच इथल्या व्याख्यात्यांनी 35 पुस्तके आणि 175 प्रकरणे लिहिली आहेत, असे पोखरीयाल यांनी सांगितले. दुसऱ्या आणि तिसऱ्या जनरेशनच्या आयआयटी संस्थांमध्ये विद्याशाखेचा विचार करता, आयआयटी इंदूरचा यश आणि प्रमाणपत्रांचा आलेख सर्वात वरचा आहे, असेही ते म्हणाले. या संस्थेने आतापर्यंत 61 पेटंट साठी दावा केला असून, त्यापेकी एका पेटंटला मंजुरीही मिळाली आहे.
शैक्षणिक क्षेत्र आणि उद्योगक्षेत्र यातील तफावत कमी करण्यासाठी आणि आत्मनिर्भर भारत, तसेच नवोन्मेष या क्षेत्रात आयआयटी इंदूरने केलेल्या प्रयत्नांचे पोखरीयाल यांनी कौतुक केले.वर्ष 2020 मध्ये NIRF च्या क्रमवारीत, दहावे स्थान, आशियाई विद्यापीठ क्रमवारीत 2020 मध्ये 55 वे स्थान आणि टाईम्स उच्च शिक्षणविषयक युवा विद्यापीठ क्रमवारीत 64 वे स्थान मिळवणाऱ्या आयआयटी इंदूर चे त्यांनी अभिनंदन केले.
तसेच आयआयटी परिसरात, केंद्रीय विद्यालय, संगणक आणि माहिती तंत्रज्ञान केंद्र, मध्यवर्ती कार्यशाळा, अभिनंदन भवन आणि तक्षशीला व्याख्यान सभागृह या इमारती, नवोन्मेशी कार्यक्रम आणि दिक्षांत समारंभ याबद्दल त्यांनी कौतुक केले. शिक्षण मंत्रालय कायम या संस्थेच्या पाठीशी उभे राहील आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करेल, असे आश्वासन त्यांनी दिले.
केंद्रीय विद्यालय संगणक आणि माहिती तंत्रज्ञान केंद्र
मध्यवर्ती कार्यशाळा अभिनंदन भवन
तक्षशीला व्याख्यान सभागृह
या समारंभात, विविध शाखा आणि अभ्यासक्रमांच्या 412 विद्यार्थ्यांना पदवीदान करण्यात आले. याच दीक्षांत समारंभात कम्प्युटर सायन्स आणि इंजिनियरिंगच्या एमएस अभ्यासक्रमाच्या पहिल्या तुकडीच्या 6 विद्यार्थ्यांना देखील पदवी देण्यात आली.
* * *
M.Chopade/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1665946)
Visitor Counter : 186