संरक्षण मंत्रालय
भारतीय नौदल - श्रीलंका नौदल सागरी सराव स्लीनेक्स -20 ला त्रिनकोमाली येथे प्रारंभ
Posted On:
18 OCT 2020 6:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 ऑक्टोबर 2020
स्लीनेक्स -20 हा भारतीय नौदल (आयएन) - श्रीलंका नौदल (एसएलएन) दरम्यान आठवा द्विपक्षीय सागरी सराव 19 ते 21ऑक्टोबर 2020 दरम्यान श्रीलंकेच्या त्रिनकोमाली येथे होणार आहे. श्रीलंका नौदलाचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग रिअर ऍडमिरल बंडारा जयथीलाक यांच्या नेतृत्वाखाली एसएलएन शिप्स सयूरा (ऑफशोर गस्त नौका ) आणि गजबाहू (प्रशिक्षण नौका ) श्रीलंका नौदलाचे प्रतिनिधित्व करतील. ईस्टर्न फ्लीटचे कमांडिंग फ्लॅग ऑफिसर रियर ऍडमिरल संजय वत्सयन यांच्या नेतृत्वाखाली भारतीय बनावटीच्या एएसडब्ल्यू कॉर्वेटेस कामोर्ता आणि किलता भारतीय नौदलाचे प्रतिनिधित्व करतील. याव्यतिरिक्त, भारतीय नौदलाचे प्रगत लाईट हेलिकॉप्टर (एएलएच) आणि चेतक हेलिकॉप्टर आयएन जहाजांवर आहेत तसेच डोर्निअर मेरीटाइम पॅट्रोल विमानही यात सहभागी होणार आहेत. यापूर्वी सप्टेंबर 2019 मध्ये विशाखापट्टणममध्ये स्लीनेक्स सरावाचे आयोजन करण्यात आले होते.
स्लीनेक्स -20 चा उद्देश आंतर-परिचालन क्षमता वाढवणे, परस्पर समन्वय सुधारणे आणि दोन्ही नौदलादरम्यान बहु-आयामी सागरी परिचालनाच्या सर्वोत्तम पद्धती आणि प्रक्रियेचे आदानप्रदान करणे हा आहे. याव्यतिरिक्त, या सरावामध्ये आपल्या देशी बनावटीची नौदल जहाजे आणि विमानांची क्षमता देखील दर्शविली जाईल. शस्त्रास्त्र गोळीबार, सीमॅनशिप इव्होल्यूशन, मानोव्हर्स आणि क्रॉस डेक फ्लाइंग ऑपरेशन्स सह पृष्ठभाग आणि हवा विरोधी प्रात्यक्षिकांचे नियोजन या सरावादरम्यान केले गेले आहे, जे दोन मैत्रीपूर्ण नौदलादरम्यान आधीच स्थापित आंतर-परिचालन क्षमतेची उच्च पातळी वाढवेल.
स्लिनेक्स सरावाची ,मालिका भारत आणि श्रीलंका यांच्यातील दृढ सहभागाचे उदाहरण आहे, ज्याने सागरी क्षेत्रात परस्पर सहकार्य मजबूत केले आहे. अलिकडच्या वर्षांत भारताच्या ‘शेजारी प्रथम ’ धोरणानुसार आणि ‘क्षेत्रातील सर्वांसाठी सुरक्षा आणि विकास ’ (सागर) या पंतप्रधानांच्या कल्पनेच्या अनुषंगाने एसएलएन आणि आयएन मधील संवादात देखील लक्षणीय वाढ झाली आहे.
श्रीलंकेच्या पूर्व किनारपट्टीला आग लागलेल्या एमटी न्यू डायमंडला, खूप मोठा क्रूड कॅरियर (व्हीएलसीसी) मदत करण्यासाठी सप्टेंबर 2020 मध्ये - स्लिनेक्स सरावादरम्यान विकसित सहकार्यामुळे संयुक्त एसएलएन - आयएन समन्वय राखला गेला.
कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर हा सराव नॉन-कॉन्टॅक्ट ‘ऍट सी-ओन्ली’ स्वरूपात आयोजित केला जात आहे.
B.Gokhale/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1665695)
Visitor Counter : 269