संरक्षण मंत्रालय
सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र ब्रह्मोसची भारतीय नौदलाच्या आयएनएस चेन्नई विनाशिकेवरून यशस्वी चाचणी
Posted On:
18 OCT 2020 6:12PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 ऑक्टोबर 2020
सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र ब्रह्मोसची भारतीय नौदलाच्या स्वदेशी तंत्रज्ञानाने बांधणी केलेल्या आयएनएस चेन्नई या विनाशिकेवरून अरबी समुद्रातील एका लक्ष्याचा भेद करीत यशस्वी चाचणी पार केली. या क्षेपणास्त्राने अत्यंत उच्च श्रेणीचे आणि अत्याधुनिक संचलन करत अचूकतेने लक्ष्याचा यशस्वी भेद केला.
प्रमुख मारक अस्त्राच्या रुपात जमिनीवरून लांब अंतरावरील लक्ष्याचा भेद करणाऱ्या क्षेपणास्त्राने नौदलाची क्षमता वाढवून युध्दनौकेची अजिंक्यता सुनिश्चित केली आहे. या बहुउपयोगी ब्रह्मोस क्षेपणास्त्राची रचना, विकास आणि निर्मिती भारत आणि रशिया यांच्या सहकार्याने करण्यात आली आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी संरक्षण संशोधन आणि विकास विभाग (DRDO), ब्रह्मोस आणि भारतीय नौदलाचे या यशस्वी चाचणीबद्दल अभिनंदन केले.
डीडीआर अँड डी सचिव आणि डिआरडीओचे अध्यक्ष डॉ जी. सतीश रेड्डी यांनी डीआरडीओतील सर्व वैज्ञानिक, ब्रह्मोस, नौदल आणि उद्योगातील सर्वांचे या यशाबद्दल अभिनंदन केले. ते म्हणाले की ब्रह्मोस क्षेपणास्त्रे भारतीय सैन्यदलाचे सामर्थ्य अनेक पटींनी वाढवतील.
S.Thakur/ S.Patgoankar /P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1665681)
Visitor Counter : 336
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam