विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

सीएसआयआर-सीएमईआरआयने शाश्वत महापालिका घन कचरा प्रक्रिया सुविधा विकसित केली


"घनकचऱ्यांचे विकेंद्रित विघटन साध्य करण्याबरोबरच मूल्यवर्धित अंतिम उत्पादने तयार करण्यातही मदत करते ": प्रा. (डॉ.) हरीश हिरानी

प्रगत विभाजन तंत्रांसह सुसज्ज,या जैव-विघटन प्रक्रियेमध्ये कमीतकमी प्रदूषण घटक आहेत

Posted On: 18 OCT 2020 5:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 ऑक्टोबर 2020

या सीएसआयआर-सीएमईआरआय एमएसडब्ल्यू तंत्रज्ञानामध्ये रोजगार निर्मितीच्या संधींच्या विकासाव्यतिरिक्त शून्य -भराव  आणि शून्य कचरा शहराची कल्पना मांडली आहे.बदलत्या पर्यावरणीय परिस्थितीत ‘महापालिकेच्या घनकचरा शाश्वत  प्रक्रिया’ या मुद्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. हा कचरा केवळ उपयुक्त  उत्पादनांमध्ये रूपांतरित करण्यासाठीच  नव्हे तर स्वच्छ वातावरण राखण्यासाठी आणि माती, हवा आणि पाणी दूषित होण्यापासून  संरक्षण करण्यासाठी देखील आवश्यक घटक आहे.

या विषयावर अधिक प्रकाश टाकण्यासाठी, सीएसआयआर-सीएमईआरआय, दुर्गापूरचे संचालक प्रा . (डॉ.) हरीश हिरानी यांनी शनिवारी आपल्या फेसबुक पेजवर 'कृषीजागरण' कार्यक्रमातील मुख्य भाषणात या विषयावर चर्चा केली. पारंपारिक कचरा प्रक्रिया तंत्रांच्या ऐतिहासिक विकासाचा आढावा घेऊन त्यांनी  सध्याच्या परिस्थितीत महापालिका घनकचऱ्याच्या  प्रक्रियेकडे विशेष लक्ष कसे द्यावे याचे प्रात्यक्षिक दाखवले.

प्रा.हिराणी म्हणाले की, कचऱ्याची अकार्यक्षम प्रक्रिया ही सर्व आजारांचे मूळ आहे कारण कचऱ्याचा भराव टाकलेली जागा रोगकारक, जीवाणू आणि किटाणू फैलावाचे केंद्र बनतात. याशिवाय, ते मिथेन गॅस उत्सर्जनाचा मोठा स्रोत बनतात , विशेषत: कंपोस्टिंग प्रक्रियेचा  उद्योजकांना परिणामकारक आर्थिक परतावा मिळत नाही. सध्याच्या परिस्थितीत कचर्‍याचे मिश्रित स्वरूप  कृषी उत्पादनांमध्ये अवजड धातूंचे सहजपणे मिश्रण  करते. सीएसआयआर-सीएमईआरआय विकसित महापालिका घनकचरा प्रक्रिया  सुविधेने केवळ घनकचऱ्याचे विकेंद्रित विघटन करायला मदत केली नाही तर वाळलेली पाने , गवत इत्यादी मुबलक प्रमाणात उपलब्ध निरुपयोगी वस्तूंची मूल्यवर्धित उत्पादने तयार करण्यास मदत केली आहे. प्रगत विभाजन तंत्रांद्वारे सीएसआयआर-सीएमईआरआय सामान्य कुटुंबांचा वर्गीकरणाच्या जबाबदारीचा भार हलका करतो.  जैव-विघटन  प्रक्रियेमध्ये कमीतकमी प्रदूषण घटक असतात. मास्क, सॅनिटरी नॅपकिन्स, डायपर इत्यादी विविध प्रकारच्या कचऱ्याला सामोरे जाण्यासाठी एमएसडब्ल्यू सुविधा विशेष क्षमतांनी सुसज्ज आहे. एमव्हीडब्ल्यू सुविधेमध्ये यूव्ही-सी लाइट्स आणि हॉट-एअरच्या माध्यमातून कोविड साखळी तोडण्यासाठी विशेष निर्जंतुकीकरण क्षमता आहे.  आम्ही सौर ऊर्जा तंत्रज्ञानाची जोड देऊन एमएसडब्ल्यू सुविधेमध्ये किमान ऊर्जेची पुरेशी क्षमता देखील मिळवली आहे, जी मिनी ग्रीडमध्ये अतिरिक्त ऊर्जा पुरवठा देखील करू शकेल. "

शून्य भरावाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी संस्थेद्वारे पायरोलिसिस प्रक्रिया हे अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरले जात आहे. ज्यामध्ये प्लास्टिकचे गॅस आणि इंधनात रूपांतरण केले जाते. ही पर्यावरणाला अनुकूल प्रक्रिया आहे आणि यातून कमी विषारी पदार्थ तयार होतात. पायरोलिसिसमध्ये जड तेल, गॅस वापरल्यामुळे स्वयंपूर्ण होण्यास मदत होते. प्लाझ्मा गॅसिफिकेशन प्रक्रियेद्वारे विषारी डायऑक्सिन आणि फ्युरेन्स तयार आणि सुधारित केल्याशिवाय घनकचऱ्यांची पर्यावरण-स्नेही विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया केली जाते. सीएसआयआर-सीएमईआरआयने विकसित केलेल्या विकेंद्रित घनकचरा व्यवस्थापन तंत्रात कचरा उपलब्ध असलेल्या कोणत्याही दूषित पदार्थांचे व्यवस्थापन करण्याची क्षमता आहे.

 

B.Gokhale/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1665670) Visitor Counter : 145