पंतप्रधान कार्यालय
ग्रँड चॅलेन्जेस वार्षिक सभा 2020 च्या उद्घाटन समारंभात, 19 पंतप्रधान नरेन्द्र मोदीचे बीजभाषण
Posted On:
17 OCT 2020 2:43PM by PIB Mumbai
ग्रँड चॅलेन्जेस वार्षिक सभा 2020 च्या उद्घाटन समारंभात, 19 ऑक्टोबर 2020 रोजी संध्याकाळी 7.30 पंतप्रधान नरेन्द्र मोदी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बीजभाषण करतील.
ग्रँड चॅलेन्जेस वार्षिक सभा ही गेले 15 वर्षे, आंतरराष्ट्रीय पातळीवर आरोग्य आणि विकास या विषयीच्या आव्हानांवर संशोधन सहयोगाला प्रोत्साहन देत आली आहे.
ग्रँड चॅलेन्जेस वार्षिक सभा 2020 ला 19-20 ऑक्टोबरला आभासी पद्धतीने भरणार आहे. ही सभा धोरणकर्ते आणि वैज्ञानिक अग्रणी यांना एकत्र आणून जागतिक पातळीवरील आरोग्याचे प्रश्न सोडवण्यासाठी सखोल वैज्ञानिक सहकार्याचे आव्हान करेल, याशिवाय कोविड-19वर भर देतानाच त्याला ‘जगासाठी भारत’ याची जोड देईल. जागतिक नेते, नामांकित शास्त्रज्ञ, आणि संशोधक या वार्षिक सभेला उपस्थित राहतील व महामारीनंतरच्या जगात शाश्वत विकासाच्या धेय्याचा पाठपुरावा करत विकासाचे गाडे सुरळीत करण्याच्या मुख्य प्रश्नावर चर्चा करतील तसेच कोविड 19 च्या व्यवस्थापनातील अडथळ्यांवर चर्चा करतील. या तीन दिवसीय कार्यक्रमात नेत्यांची भाषणे, गटचर्चा, आणि अनौपचारीक आभासी संभाषणे होतील. यासाठी महामारीशी झुंज देण्यातील अडचणी, महामारीचे व्यवस्थापन आणि विकासाला चालना, आणि जागतीक पातळीवर महामारीशी लढ्यातील अडचणींवर उपाययोजना आणि पुढील, संभाव्य महामारीला रोखण्याचे नियोजन हे विषय असतील. या वार्षिक सभेसाठी 40 देशातील 1600 सभासद उपस्थित असतील.
ग्रँड चॅलेन्जेस वार्षिक सभा 2020 याचे संयुक्त यजमानपद बिल व मेलिंडा गेट्स फाउंडेशन सांभाळतील तर जैवतंत्रज्ञान विभाग, भारत सरकार, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद,निती आयोग यासह ग्रँड चॅलेन्जेस, कॅनडा, आंतराष्ट्रीय विकासासाठी अमेरिकन एजन्सी हे सहभागी असतील.
आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालय,विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे केंद्रीय मंत्री हर्षवर्धन हे उद्घाटनपर भाषण करतील. बिल गेटस् सह अध्यक्ष असतील व पूर्ण चर्चासत्राना उपस्थित राहतील
ग्रँड चॅलेन्जेस इंडिया हा भारत सरकारचा जैवतंत्रज्ञान विभाग आणि 2012 ला स्थापन झालेला मेलिंदा गेटस फाउंडेशन हा भागीदारीत सहकार्य करतील. ग्रँड चॅलेन्जेस इंडिया आरोग्य आणि विकास यांना महत्त्व देऊन शेती, पोषण, मलःनिस्सारण, आईची आणि बाळाची तब्येत या आरोग्यविषयक तक्रारींवर काम करते
***
B.Gokhale/V.Sahajrao/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1665445)
Visitor Counter : 169
Read this release in:
Assamese
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam