श्रम आणि रोजगार मंत्रालय
‘सरकारी कर्मचारी आणखी महागाई भत्ता मिळण्यासाठी सज्ज’ या मथळ्याखाली काही माध्यमांमध्ये आलेल्या वृत्ताचे कामगार मंत्रालयाकडून खंडन
प्रविष्टि तिथि:
16 OCT 2020 6:58PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 ऑक्टोबर 2020
सरकारी कर्मचारी आणखी महागाई भत्ता मिळण्यासाठी सज्ज या मथळ्याखाली 16-10-2020 ला काही माध्यमांमध्ये आलेल्या वृत्ताचे कामगार मंत्रालयाने खंडन केले आहे. नव्या इंडेक्समुळे औद्योगिक कामगार आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ होईल असे कधीही म्हटले नसल्याचे सांगून केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाने यासंदर्भातला माध्यमातला अहवाल नाकारला आहे.
मंत्रालयाने दिलेले स्पष्टीकरण असे आहे- श्रम आणि रोजगार मंत्रालयाशी संलग्न कामगार ब्युरो, औद्योगिक कामगारांसाठी ग्राहक किंमत निर्देशांकाची नवी मालिका (CPI-IW), 2016 हे प्रमाण वर्ष मानून 21 ऑक्टोबर 2020 ला जारी करणार आहे. हा निर्देशांक सरकारी कर्मचारी आणि संघटीत क्षेत्रातल्या कामगारांना देय महागाई भत्याच्या आढाव्यासाठी उपयोगात आणला जातो. मात्र नवा निर्देशांक सरकारी कर्मचारी आणि औद्योगिक कामगारांच्या वेतनात वाढ होण्याकडे नेईल असे मंत्रालयाने कधीही म्हटले नाही. सद्य स्थितीत असा अंदाज वर्तवणे हे खूपच घाईचे ठरेल असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
* * *
B.Gokhale/N.Chitale/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1665227)
आगंतुक पटल : 220