आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

डॉ हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली एफएसएसएआयकडून आयोजित ‘जागतिक अन्न दिवस’ साजरा

Posted On: 16 OCT 2020 4:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 16 ऑक्‍टोबर 2020

 

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ हर्ष वर्धन यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक अन्न दिवस साजरा करण्यात आला. एफएसएसएआयने याचे आयोजन केले होते. एकत्रित वाढ, पोषण ही यावर्षीची संकल्पना होती. आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ अश्विनीकुमार चौबे कार्यक्रमात व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सहभागी झाले.

DSC_4708.JPG

डॉ हर्ष वर्धन म्हणाले, संक्रमण परिस्थितीमुळे जगासमोर अभूतपूर्व आव्हाने निर्माण झाली आहेत. आहार, पोषण, आरोग्य, प्रतिकारक्षमता याविषयी नव्याने लक्ष केंद्रीत झाले आहे. एफएसएसएआयची ‘ईट राईट इंडिया’ चळवळ सर्वांसाठी सुरक्षित आणि पोषक अन्नासंदर्भात प्रसार करत आहे. यामुळे अन्न सुरक्षा परिसंस्थेत सुधारणा होऊन नागरिकांचे आरोग्यमान उंचावेल.

भारताला 2022 पर्यंत ट्रान्स-फॅट फ्री करण्याचे ध्येय आहे, जे जागतिक आरोग्य संघटनेच्या ध्येयापेक्षा एक वर्ष अगोदर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवीन भारत संकल्पनेशी हे सुसंगत आहे. ‘ईट राईट इंडिया’ आणि ‘फिट इंडिया’ या दोन चळवळींमध्ये मोठी परिवर्तनक्षमता असल्याचे सांगत त्यांनी स्वच्छ भारत अभियान, जल जीवन मिशन आणि पर्यावरण मंत्रालयाच्या इतर उपक्रमामुळे भारतीय नागरिकांचे आरोग्य सुधारेल आणि पर्यावरण चांगले होईल, असे सांगितले.

DSC_4664.JPG

आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यासाठी योग्य आहार सर्जनशीलता भित्तीपत्रिका आणि छायाचित्र स्पर्धेची सुरुवात करण्यात आली. तसेच एफएसएसएआय आणि स्मार्ट सिटी मिशन आणि फूड फाऊंडेशन, युके यांच्या भागीदारीने ‘ईट स्मार्ट सिटी’ आव्हान सुरु करण्यात आले. जे भारताच्या स्मार्ट सिटींमध्ये योग्य अन्नविषयक सवयींचे वातावरण तयार करेल आणि इतर शहरांना त्याचे अनुसरण करण्यासाठी एक उदाहरण स्थापित करु शकेल.

‘न्यू नॉर्मल ऑफ कोविड-19’, ‘डू यु ईट राईट?’ ईट राईट कॅम्पससाठी ‘ऑरेंज बूक’ आणि एफएसएसएआयकडून राज्यांसाठीच्या हस्तपुस्तिकेचे याप्रसंगी डॉ हर्ष वर्धन यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

 

* * *

S.Thakur/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1665149) Visitor Counter : 291