ग्रामीण विकास मंत्रालय
गरिब कल्याण रोजगार योजनेच्या 16व्या आठवड्यात 4.31 लाखांपेक्षा जास्त घरे 1.37 लाख जलसाठे, गुरांसाठी 38,287 निवारे, 26,459 शेततळी आणि 17,935 सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारली गेली
Posted On:
15 OCT 2020 7:37PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर 2020
गरीब कल्याण रोजगार योजनेची (GKRA) उद्दीष्टे साध्य करण्याच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणांवर बांधकामे केली गेली. यामध्ये 1,37,787 जलसाठ्यांची बांधणी, 4,31,640 ग्रामीण घरे, गुरांसाठी 38,287 निवारे, 26,459 शेततळी आणि 17,935 सार्वजनिक स्वच्छतागृहे यांचा समावेश आहे. यापैकी 7,816 बांधकामे जिल्हा मिनरल निधीतून केली गेली, 2,123 ग्रामपंचायतींनी इंटरनेट कनेक्टीविटी पुरवण्यात आली, या पैकी एकूण 22,592 कामे घनकचरा आणि मलनिःसारणाची होती तर या अभियानात 65,374 उमेदवारांना कृषी विज्ञान केंद्रातून कौशल्य प्रशिक्षण देण्यात आले.
16व्या आठवड्याच्या शेवटी 33 कोटी मनुष्यदिन एवढा रोजगार देण्यात आला आणि अभियानाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी 33114 कोटी रुपये आतापर्यंत खर्च करण्यात आले.
कोविड-19 प्रकोपादरम्यान रोजगाराच्या शोधात गावी परतलेल्या स्थलांतरीत मजूरांना तसेच याची झळ बसलेल्या ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगार आणि रोजगाराच्या संधी मिळवून देण्यासाठी GKRAचा आरंभ झाला. सहा राज्यातील जे स्थलांतरीत मजूर गावी परतले, त्यांना रोजगार देण्यासाठी अभियानाने प्रधान्यक्रमाने काम केले. या राज्यांमधील 116 जिल्ह्यांमधील रहिवाश्यांना रोजगाराच्या संधी देऊन या अभियानाने गावकऱ्यांना सक्षम केले आहे.
12 मंत्रालय विभाग/ खाती आणि राज्य सरकारे स्थलांतरीत मजूरांना लाभ मिळवून देत आहेत हेच या अभियानाचे यश आहे. यापैकी जे पुन्हा बाहेर न पडता इथेच राहणार आहेत त्यांच्यासाठी रोजगाराची सोय करण्याच्या दृष्टीने या बाबतीत दूरपल्ल्याचा विचार आणि योजना कार्यान्वित करणे आवश्यक आहे.
B.Gokhale/V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1664887)
Visitor Counter : 239