रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
गडकरी यांनी केरळमधील आठ राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली
राज्याच्या आर्थिक समृद्धीला मोठी चालना देण्यासाठी 12,692 कोटी रुपये खर्चाचे 200 कि.मी. लांबीचे महामार्ग
2024 पर्यंत 19,800 कोटी रुपये खर्चाची राष्ट्रीय महामार्गाची कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहेः गडकरी
Posted On:
13 OCT 2020 6:57PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर 2020
केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज केरळमध्ये आठ राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी झाली. या कार्यक्रमाला राज्यपाल आरिफ मोहम्मद खान, मुख्यमंत्री पिनाराई विजयन आणि केंद्रीय राज्यमंत्री जनरल (सेवानिवृत्त) डॉ. व्हीके सिंग आणि व्ही. मुरलीधरन, राज्याचे मंत्री, खासदार , आमदार आणि केंद्रातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
ते म्हणाले, कार्यक्षम मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक सक्षम करण्यासाठी मुख्य मूळ-गंतव्य स्थानांच्या जोडी दरम्यान मालवाहतुकीच्या वैज्ञानिक अभ्यासानुसार भारतमाला परियोजनेची संकल्पना आखण्यात आली. देशात भारतमाला परियोजनेअंतर्गत 35,000 कि.मी.चे राष्ट्रीय महामार्ग विकसित करण्यात येत आहेत. यापैकी 1,234 किमी राष्ट्रीय महामार्ग केरळ राज्यात भारतमाला परियोजनेचा एक भाग म्हणून विकसित करण्यात येत आहेत. या व्यतिरिक्त, 119 किमी बंदर जोडणी रस्ते भारतमाला / सागरमाला योजनेंतर्गत उन्नतीकरणाची योजना आहे. दिल्ली मुंबई एक्स्प्रेस वे, दिल्ली अमृतसर कटरा एक्स्प्रेस वे, चेन्नई - बंगळुरू एक्सप्रेस वे इत्यादी अनेक महत्वाकांक्षी कॉरिडोरदेखील भारतमाला परियोजनेचा भाग म्हणून विकसित केले जात आहेत.
गडकरी पुढे म्हणाले की, भारतमाला परियोजनेचा एक भाग म्हणून 1,760 कि.मी. लांबीचा कन्याकुमारी इकॉनॉमिक कॉरिडोर विकसित केला आहे. मुंबई ते कन्याकुमारीपर्यंत देशाच्या संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर संपर्क सुधारणार्या कॉरिडॉरमुळे या क्षेत्राची आर्थिक भरभराट होईल. मुंबई- कन्याकुमारी इकॉनॉमिक कॉरिडोरचा एक भाग म्हणून केरळ राज्यात 50,000 कोटी रुपयांच्या गुंतवणूकीने 650 कि.मी. लांबीचे 23 प्रकल्प विकसित केले जात आहेत. ते म्हणाले की, केरळच्या उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत संपूर्ण लांबीचा हा कॉरिडॉर केरळची जीवनरेखा बनेल अशी अपेक्षा आहे.
मंत्री पुढे म्हणाले, 11,571 कोटी रुपयांच्या गुंतवणूकीसह 177 कि.मी. लांबीच्या आणखी 7 प्रकल्पांमध्ये कामांना मंजुरी देण्यात आली असून बांधकाम सुरू केले आहे.
रस्ते वाहतूक, महामार्ग राज्यमंत्री जनरल (सेवानिवृत्त) डॉ व्ही के. सिंह म्हणाले की, केरळमध्ये या प्रकल्पांचा चांगला फायदा होईल. आर्थिक कॉरिडॉरद्वारे संपर्क आणि व्यापार तसेच वाणिज्य सुधारेल असे ते म्हणाले. ते म्हणाले की, असाच एक कॉरिडोर मुंबई ते कन्याकुमारी दरम्यान असून उत्तरेकडून दक्षिणेकडे केरळ मार्गे जातो. या 1700 कि.मी. पेक्षा अधिक लांबीच्या कॉरिडॉरपैकी 650 किमी लांबीचे 23 प्रकल्प केरळमध्ये आहेत , ज्यासाठी अंदाजे 50000 कोटी रुपये खर्च येईल . यामुळे केरळ अधिक समृद्ध होईल आणि असारगोड, कोझिकोड, एर्नाकुलम, कोलम इत्यादी काही प्रमुख शहरांशी संपर्क सुधारेल.
प्रकल्पांचा तपशीलः
राष्ट्राला समर्पित :
प्रकल्पाचे नाव
|
लांबी (किमी )
|
प्रकल्प खर्च (कोटी रुपये)
|
4-Laning of Thiruvananthapuram Bypass from Kazhakuttom to Mukkola on NH-66 (Old NH-47)
|
26.50
|
Rs. 1120.86
|
पायाभरणी
Sr. No
|
Name of Project
|
Length
(km)
|
Project Cost
(Rs. crore )
|
1
|
Six laning of Thalapady Km. 17.200 to Changala Km. 57.200 of NH-66 (Old NH-17)
|
39
|
1981.07
|
2.
|
Six laning of Changala Km. 57.200 to Neleshwaram Km. 95.650 of NH-66 (Old NH-17)
|
37.27
|
1746.45
|
3.
|
Six laning of Neleshwaram town to Thalipparamba Km 96.450 to Km. 137.900 NH-66 (Old NH-17)
|
40.11
|
3041.65
|
4.
|
Six laning of Thalipparamba to Muzhapilangad Km 137.900 to Km. 170.600 NH-66 (Old NH-17)
|
29.95
|
2714.6
|
5.
|
Six laning of Paloli Palam and Moodadi Bridge & allied works NH-66 (Old NH-17)
|
2.1
|
210.21
|
6.
|
Six laning of Kozhikode Bypass km.230.400 to km 258.800 NH-66 (Old NH-17)
|
28.4
|
1853.42
|
7.
|
Construction of High Level Bridge over Cheruthoni River at km 32/500 on NH-185
|
0.30
|
23.83
|
TOTAL
|
177 Km.
|
Rs. 11,571.23
|
M.Iyengar/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1664081)
Visitor Counter : 252