वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

भारत-मेक्सिको यांच्यात व्यापार, गुंतवणूक आणि सहकार्य या विषयावरची पाचवी द्विपक्षीय उच्चस्तरीय बैठक

Posted On: 13 OCT 2020 3:36PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर 2020

भारत-मेक्सिको यांच्यात व्यापार, गुंतवणूक आणि सहकार्य वृद्धिंगत करण्याबाबतची पाचवी उच्चस्तरीय द्विपक्षीय बैठक 9 ऑक्टोबर रोजी दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून झाली. भारताचे वाणिज्य सचिव डॉ अनुप वाधवान आणि मेक्सिकोच्या परराष्ट्र व्यापार उपमंत्री लूझ मारिया दे ला मोरा यांनी संयुक्तपणे या बैठकीचे अध्यक्षपद भूषवले. दोन्ही देशांचे विविध मंत्री, विभाग आणि उद्योग महासंघाचे प्रतिनिधी या बैठकीत सहभागी झाले होते.

गेल्या काही वर्षात भारत-मेक्सिकोदरम्यान झालेल्या द्विपक्षीय आणि व्यावसायिक संबंधांचा दोन्ही बाजूंकडून आढावा घेण्यात आला. त्यात सद्यस्थितीतील अनेक प्रश्न, खी प्रलंबित मुद्दे, ज्यात दृक श्राव्य सहकार्य, द्विपक्षीय गुंतवणूक करार, कृषी उत्पादनांसाठी बाजारात प्रवेश, स्वच्छता आणि फायटोसैनीटरी अशा विविध विषयांवरील द्विपक्षीय मुद्द्यांवर या बैअथकित चर्चा झाली. त्याशिवाय बौद्धिक संपदा अधिकार आणि पर्यटन तसेच जनसंपर्क वाढवण्यावर देखील चर्चा झाली. 

या बैठकीत उद्योग क्षेत्रातील दोन सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. त्याशिवाय, भारतीय इलेक्ट्रोनिक्स आणि कॉम्पुटर सॉंफ्टवेअर निर्यात प्रोत्साहन परिषद आणि मेक्सिकोतील समकक्ष संस्थेदरम्यानही एक सामजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. तसेच फिक्की आणि मेक्र्सिकोतील उद्योग-वाणिज्य संस्था COMCE यांच्यात देखील दोन्ही राष्ट्रांमधील औद्योगिक संबंध अधिक वाढवण्याबाबत देखील यावेळी एक सामंजस्य करार करण्यात आला.

त्यासोबतच, भारत आणि मेक्सिको यांच्यातील परस्परपूरक क्षमतांचा पूर्णपाने वापर करुन घेण्यासाठी, द्विपक्षीय सबंध अधिक विकसित आणि विविधांगी करण्याबाबत दोन्ही देशांनी सहमती व्यक्त कली. औषधनिर्माण, वैद्यकीय उपकरणे, आरोग्य व्यवस्था, कृषी उत्पादने, मस्त्य व्यवसाय, अन्नप्रक्रिया आणि हवाई अवकाश उद्योग अशा क्षेत्रात सहकार्य वाढवण्याबाबत यावेळी चर्चा झाली. या बैठकीनंतर, एक संयुक्त निवेदनही प्रसिद्ध करण्यात आले.

 

M.Iyengar/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1663986) Visitor Counter : 174