आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

आरोग्य मंत्रालयाच्या ई-संजीवनी दूरवैद्यकीय उपक्रमाचा 5 लाख जणांना लाभ

Posted On: 12 OCT 2020 8:55PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर 2020


आरोग्य मंत्रालयाच्यावतीने सुरू करण्यात आलेला ई-संजीवनी दूरवैद्यकीय सेवा- उपक्रम, रूग्ण आणि डॉक्टरांमध्ये आता अधिकाधिक लोकप्रिय होत आहे. अतिशय कमी कालावधीमध्ये या सेवेचा लाभ आत्तापर्यंत सुमारे पाच लाख जणांनी घेतला आहे.  दूरध्वनीव्दारे रूग्णांना या उपक्रमामध्ये सहभागी होवून आपल्या आरोग्यविषयक समस्येवर मार्गदर्शन घेता येते. गेल्या 17 दिवसांमध्ये एक लाख लोकांनी दूरध्वनीच्या माध्यमाने ही सेवा घेतली आहे.

आरोग्य सेवांचे डिजिटल वितरण करण्यासाठी रूपरेषा म्हणून ई-संजीवनी आता हळूहळू भारतीय आरोग्य सेवा क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने रूळत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये ई-संजीवनी मार्फत आरोग्य विषयक प्रश्नांवर मार्गदर्शन घेण्यासाठी दररोज येणाऱ्या दूरध्वनींची संख्या 8000 पर्यंत पोहोचली आहे. सध्या ई-संजीवनी हा उपक्रम 26 राज्यांमध्ये दोन प्रकारांनी सुरू आहे. यामध्ये डॉक्टर ते डॉक्टर (ई-संजीवनी एबी-एचडब्ल्यूसी) आणि रूग्ण ते डॉक्टर (ई-संजीवनी ओपीडी) यांचा समावेश आहे.

डॉक्टर ते डॉक्टर (ई-संजीवनी एबी-एचडब्ल्यूसी) उपक्रमाला केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्र्यांनी नोव्हेंबर 2019 मध्येच प्रारंभ केला होता. यामध्ये 1,55,000 आरोग्य आणि कल्याण केंद्रांना समाविष्ट करून घेण्यात आले होते. यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या रूग्णालयांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येत होता. याअंतर्गत आयुष्मान भारत योजनेचेही काम करण्यात येत होते.

या उपक्रमाचा महत्वाकांक्षी दुसरा प्रकार रूग्ण ते डॉक्टर (ई-संजीवनी ओपीडी) सुरू करण्यात आला. संपूर्ण देशामध्ये कोविड-19 महामारीचा उद्रेक झाल्यानंतर टाळेबंदीच्या काळामध्ये देशभरातल्या ओपीडी बंद करण्यात आल्या. अशावेळी रूग्णांना ई-संजीवनी ओपीडी अतिशय लाभदायक ठरली. हा उपक्रम रूग्ण आणि डॉक्टर अशा दोघांच्याही सुविधेचा ठरला. या उपक्रमामध्ये 100 पेक्षा जास्त वैद्यकीय व्यवसायिक 1000 पेक्षा जास्त रूग्णांना दूरध्वनीच्या माध्यमातून त्यांना असलेल्या आरोग्यविषयक समस्यांवर उपाय सांगतात. तसेच औषधोपचारांची माहिती दिली जाते. यापैकी अनेक वैद्यकीय तज्ज्ञांनी 10,000 पेक्षा जास्त रुग्णांना दूरध्वनीवरून आरोग्यविषयक मार्गदर्शन केले आहे. तसेच एकापेक्षा अधिक वेळा ई-संजीवनी सेवा वापरून वैद्यकीय सल्ला घेणाऱ्या रूग्णांचे प्रमाण 20 टक्के आहे.

ई-संजीवनी आणि ई-संजीवनी ओपीडी या मंचाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या 7895 जणांनी वैद्यकीय सेवा घेतली आहे.

 

eSanjeevani Teleconsultations (12 Oct 2020)

Sr No.

 

Teleconsultations

 

INDIA

500091

1

Tamil Nadu

169977

2

Uttar Pradesh

134992

3

Himachal Pradesh

39326

4

Kerala

39300

5

Andhra Pradesh

31365

6

Uttarakhand

16442

7

Madhya Pradesh

14965

8

Gujarat

10839

9

Karnataka

9498

10

Maharashtra

7895

11

Punjab

6427

12

Delhi

6158

13

Rajasthan

5321

14

Jharkhand

1882

15

Chandigarh

1538

16

Manipur

1484

17

Haryana

1465

18

Assam

568

19

Telangana

278

20

Jammu And Kashmir

182

21

Goa

55

22

Mizoram

51

23

Arunachal Pradesh

47

24

Chhattisgarh

23

25

Puducherry

9

26

Bihar

4

 

* * *

S.Thakur/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1663827) Visitor Counter : 166