गृह मंत्रालय
स्वामित्व योजनेच्या प्रारंभाबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मानले आभार
पंतप्रधान ग्रामीण भारताच्या भरभराटीसाठी अहोरात्र मेहनत करत आहेत. स्वामित्व योजनेचा प्रारंभ ग्रामीण स्वराज्याच्या दिशेने मैलाचा दगड ठरेल.
नानाजी देशमुख यांच्या जयंतीला सुरू करण्यात आलेली ही योजना त्यांना खरी श्रद्धांजली
Posted On:
11 OCT 2020 8:13PM by PIB Mumbai
‘स्वामित्व योजनेच्या’ प्रारंभासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.
ग्रामीण भारताला स्वावलंबी करण्यासाठी असलेल्या दूरदर्शी, ऐतिहासिक ‘स्वामित्व योजनेच्या शुभारंभासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांचे आभार मानतो, असे शहा यांनी ट्विटवर म्हटले आहे.
ग्रामीण भारताला संपन्न आणि समृद्ध करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अहोरात्र काम करत आहेत. ‘स्वामित्व योजनेचा’ प्रारंभ ग्रामीण स्वराज्याच्या दिशेने एक मैलाचा दगड ठरेल. नानाजी देशमुख यांच्या जयंतीला सुरू करण्यात आलेली ही योजना त्यांना खरी श्रद्धांजली आहे, असे शहा यांनी म्हटले आहे.
गरीब व ग्रामीण जनतेला सक्षम करणे हे मोदी यांच्या आत्मनिर्भर भारताचे खरे लक्ष्य असून ‘स्वामित्व योजनेमुळे’ ग्रामीण भारतातील भू-संपत्ति मालकांना नोंदीच्या अधिकारांचा हक्क मिळणार आहे.
ही योजना ग्रामीण भागातल्या नागरिकांना त्यांचा अधिकार आणि सन्मान देण्याचा एक अभिनव प्रयत्न आहे. त्यांना आता बँकांकडून सहजपणे कर्ज मिळू शकेल आणि आपली स्वप्ने तेही पूर्ण करू शकतील, असे केंद्रीय गृहमंत्र्यांनी म्हटले आहे.
‘स्वामित्व योजना’ ही केंद्र सरकारच्या पंचायती राज मंत्रालयाने सुरू केली आहे. पंतप्रधानांनी राष्ट्रीय पंचायती राज दिवसानिमित्त 24 एप्रिल , 2020 रोजी या योजनेची घोषणा केली होती. ग्रामीण भागातील नागरिकांना नोंदीचा अधिकार देणे आणि संपत्ती कार्डचे वितरण करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
चार वर्षात टप्याटप्प्याने या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. वर्ष 2020 ते 2024 दरम्यान ही योजना पूर्ण करण्यात येणार असून देशातील 6.62 लाख गावे योजनेखाली आणण्यात येणार आहेत. यातली एक लाख गावे प्रारंभीक टप्प्यात 2020-21 मध्ये योजनेखाली आणण्यात येणार आहेत. या टप्प्यात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, हरियाणा, मध्य प्रदेश, उत्तराखंड आणि कर्नाटकमधल्या काही गावांसह पंजाब आणि राजस्थानमधील काही सीमावर्ती गावे आहेत.
ग्रामीण भारत को सम्पन्न व समृद्ध बनाने की दिशा में दिन रात काम कर रहे प्रधानमंत्री @narendramodi जी द्वारा आज ‘स्वामित्व योजना’ का शुभारंभ करना ग्रामीण स्वराज की दिशा में एक मील का पत्थर साबित होगा। यह योजना नानाजी देशमुख की जयंती पर उन्हें सच्ची श्रद्धांजलि है।#SampatiSeSampanta
— Amit Shah (@AmitShah) October 11, 2020
इस दूरदर्शी व ग्रामीणों भारत को स्वावलंबी बनाने वाली ऐतिहासिक ‘स्वामित्व योजना’ के शुभारंभ पर प्रधानमंत्री @narendramodi जी और कृषि मंत्री @nstomar जी का आभार व्यक्त करता हूँ।
इस योजना से ग्रामीण भारत के भू-संपत्ति मालिकों को ‘रिकॉर्ड ऑफ राइट्स' का हक मिलेगा। #SampatiSeSampanta
— Amit Shah (@AmitShah) October 11, 2020
मोदी जी द्वारा गरीबों व ग्रामीणों को सक्षम बनाना ही आत्मनिर्भर भारत का सच्चा लक्ष्य है।
यह योजना ग्रामीण क्षेत्र के लोगों को उनका अधिकार व सम्मान देने का एक अभिनव प्रयास है। अब उन्हें आसानी से बैंकों से ऋण प्राप्त होगा और वो भी अपने सपनों को पूरा कर पाएँगे।#SampatiSeSampanta
— Amit Shah (@AmitShah) October 11, 2020
***
S.Thakur/S.Kakade/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1663587)