अंतराळ विभाग
भारताच्या अंतराळ क्षेत्रातील यात्रेत भारतातील खाजगी क्षेत्र होणार सहप्रवासी :डॉ. जितेंद्र सिंग
खाजगी कंपन्यांना उपग्रहांच्या प्रक्षेपणासाठी आणि अंतराळ क्षेत्रातील उपक्रमांसाठी समान पातळीवर संधी होणार उपलब्ध
Posted On:
11 OCT 2020 7:24PM by PIB Mumbai
केंद्रीय मंत्री (स्वतंत्र प्रभार), ईशान्य राज्ये विकास (DoNER), पंतप्रधान कार्यालय (MoS PMO) कार्मिक, सार्वजनिक तक्रार, निवृत्ती, अणूऊर्जा आणि अंतराळ, डॉ. श्री. जितेंद्र सिंग यांनी आज सांगितले की, भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)ने हे क्षेत्र आता खाजगी क्षेत्राला खुले करण्याची सर्व तयारी करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील अंतराळ विभागातील काही पथदर्शी ऐतिहासिक सुधारणांचा उल्लेख करत डॉ. जितेंद्र सिंग म्हणाले, की स्वतंत्र भारताच्या इतिहासात प्रथमच भविष्यकालीन ग्रहांच्या शोधमोहीमा, अंतराळाबाहेरील मार्गक्रमण इत्यादी खाजगी क्षेत्रासाठी खुल्या होणार आहेत. हा मोदी सरकारच्या आत्मनिर्भर भारताच्या पथदर्शी आराखड्यातील आत्मनिर्भरतेचा एक भाग असून त्यायोगे अंतरीक्ष क्षेत्रात खाजगी क्षेत्राला पुढाकार देऊन चालना देत सहभागी करण्यात येणार आहे .

यालाच पुष्टी देत डॉ. जितेंद्र सिंग पुढे म्हणाले, की भारतीय खाजगी क्षेत्र हे भारताच्या अंतराळ क्षेत्रातील सहप्रवासी असेल. ते म्हणाले, खाजगी कंपन्यांना उपग्रहांच्या प्रक्षेपणासाठी आणि अंतराळ क्षेत्रातील उपक्रमांसाठी समान पातळीवर संधी उपलब्ध होईल.
डॉ. जितेंद्र सिंग या नव्या सुधारणांबाबत बोलतांना म्हणाले की, यामुळे देशातील अंतराळ क्षेत्रातील उपक्रम, पुरवठा आधारित पध्दतीवरून मागणी आधारीत पध्दतीत परीवर्तित होईल. भारतीय राष्ट्रीय अंतरीक्ष विकास आणि अधिकार केंद्र स्थापन करून (इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन ॲण्ड ऑथरायझेशन सेंटर IN-SPACe) कार्यप्रणाली सुलभ करत, खाजगी क्षेत्राला इस्रोच्या सोयीसुविधा आणि इतर उपयुक्त मालमत्ता त्यांच्या क्षमता सुधारण्यासाठी वापरता येतील.
खाजगी कंपन्यांना त्यांचे अर्ज पाठविण्यासाठी तयार केलेल्या वेबलिंकची माहिती डॉ. जितेंद्र सिंग यांनी यावेळी पुढे दिली. कंपन्यांकडून आणि स्टार्ट अप्स कडून आलेल्या या माहितीचे उच्चस्तरीय समितीद्वारे विश्लेषण केले जाईल, असेही ते पुढे म्हणाले.
<><><><><>
B.Gokhale/S.Patgaonkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1663566)
Visitor Counter : 281