भारतीय निवडणूक आयोग
कोविड-19 च्या काळामध्ये राष्ट्रीय/राजकीय पक्षांना संपर्क साधणे अवघड असल्याचे लक्षात घेवून प्रचारासाठी प्रसारण / प्रक्षेपणासाठी दुप्पट कालावधी
Posted On:
09 OCT 2020 10:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 ऑक्टोबर 2020
सध्या संपूर्ण देशामध्ये कोविड-19 महामारीचा उद्रेक आहे. अशा काळामध्ये निवडणूक आयोगाच्यावतीने निवडणूक कार्यक्रम घोषित झाला आहे. एकूण प्रासंगिकता लक्षात घेवून भारतीय निवडणूक आयोगाने प्रसार भारत महामंडळाशी चर्चा करून सर्व राष्ट्रीय पक्षांना आणि बिहारमधल्या मान्यताप्राप्त प्रादेशिक पक्षांना प्रचारासाठी प्रसारण आणि प्रक्षेपणाच्या कालावधीमध्ये दुप्पट वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. दूरदर्शन आणि आकाशवाणी यांच्यावरून बिहार विधानसभेच्या 2020 सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रचार कालावधीत ही वाढ करण्यात आली आहे.
या संदर्भामध्ये निवडणूक आयोगाने आदेश क्रमांक 437/टीए-एलए/1/2020/ दि. 9 ऑक्टोबर, 2020 रोजी बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रीय / प्रादेशिक राजकीय पक्षांना प्रसारण/प्रक्षेपण यासाठी वेळांचे वाटप करण्याबाबत माहिती दिली आहे.
यासंदर्भात निवडणूक आयोगाचा आदेश पाहण्यासाठी येथे क्लिक करावे.
* * *
B.Gokhale/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1663303)
Visitor Counter : 143