कोळसा मंत्रालय
कोळसा मंत्रालयाकडून कोळसा क्षेत्रातील संशोधन प्रयत्नांसाठी संकेतस्थळ सुरू
पूर्ण आणि सुरू असलेल्या संशोधन प्रकल्पांचा तपशील वेबसाइटवर उपलब्ध
संशोधन व विकास प्रकल्पांमध्ये पारदर्शकतेला चालना
Posted On:
09 OCT 2020 8:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 ऑक्टोबर 2020
"कोळसा क्षेत्रातील ज्ञान व संशोधन कार्याचा प्रसार व त्याला प्रोत्साहन देण्याला हे संकेतस्थळ मदत करेल,”असे कोळसा मंत्रालयाचे सचिव अनिल जैन यांनी सांगितले. कोळसा क्षेत्रातील संशोधन व विकास उपक्रमांना चालना देण्यासाठी हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. हे संकेतस्थळ विकसित केल्याबद्दल जैन यांनी सीएमपीडीआयच्या प्रयत्नांचे कौतुक केले. कोळसा क्षेत्रातील संशोधन व विकास यासाठी विविध संस्थांनी केलेल्या प्रयत्नांचे वेब दुवे संकेतस्थळावर ठेवण्याची सूचना जैन यांनी यावेळी केली.
कोळसा मंत्रालयाच्या संशोधन व विकास कामांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि कोळसा क्षेत्रातील संशोधन व विकास प्रयत्नांसाठी संशोधन संस्थांना आकर्षित करण्यासाठी मंत्रालयाने हे संकेतस्थळ सुरू केले आहे. अनिल जैन यांनी मंत्रालयाच्या स्थायी वैज्ञानिक संशोधन समितीच्या 56 व्या बैठकीत (https://scienceandtech.cmpdi.co.in/) या संकेतस्थळाचे उदघाटन केले. कोल इंडिया आर अँड डी आर्म, सेंट्रल मायन्स प्लॅनिंग अँड डिझाइन इन्स्टिट्यूट लिमिटेड (सीएमपीडीआय) यांनी ही वेबसाइट विकसित केली आहे.
विविध स्वरूपात कोळसा संशोधन प्रकल्पांची अंमलबजावणी करण्यासंदर्भातील मार्गदर्शक तत्वे या संकेतस्थळावर विस्तृतपणे दर्शविण्यात आली आहेत जेणेकरून कोणालाही विहित पद्धतीत प्रस्ताव सादर करता येतील. तसेच पारदर्शकता येण्यासाठी आणि प्रकल्पांचे पुनरावृत्तीचे स्वरूप टाळण्यासाठी पूर्ण केलेल्या प्रकल्पांची आणि चालू असलेल्या संशोधन प्रकल्पांची यादी आणि निष्कर्ष देखील संकेतस्थळावर आहेत. कोळसा आणि लिग्नाईट क्षेत्राशी संबंधित फोटो, व्हिडिओ आणि बातम्यांची कात्रणे तसेच विविध प्रकाशने संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. देशाच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन भविष्यात कोळसा संशोधनासाठीची ठोस क्षेत्रे या संकेतस्थळावर आहेत.
उत्पादन, उत्पादकता, सुरक्षा, कोळसा लाभ यामधील सुधारणा आणि पर्यावरण व पर्यावरणशास्त्राचा वापर आणि संरक्षण, स्वच्छ कोळसा तंत्रज्ञान व संबंधित क्षेत्र इत्यादींसाठी कोळसा व लिग्नाइट क्षेत्रातील संशोधन व विकास कार्यक्रमांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. मंत्रालयाकडून या विषयांवर संशोधन कार्य करण्यासाठी निधी पुरवला जातो.
आयआयटी, एनआयटी, आयआयएससी, एनआरएससी, सीएसआयआर प्रयोगशाळा, आणि इतर नामांकित विद्यापीठ इत्यादी राष्ट्रीय संशोधन आणि शैक्षणिक संस्था, कोळसा आणि लिग्नाइट उत्पादक कंपन्यांच्या सक्रिय सहभागाने संशोधन प्रकल्प सध्या राबवित आहेत. संशोधन प्रकल्पांसाठी नवीन क्षेत्रे मंत्रालयान स्थापन केलेल्या उच्च-स्तरीय तांत्रिक समितीद्वारे शोधली गेली आहेत. हे सीएमपीडीआयच्या संकेतस्थळावर प्रदर्शित केले गेले आहे, ज्यावर आधारित संशोधन प्रस्ताव वर्षभर सादर करता येतील.
* * *
B.Gokhale/S.Tupe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1663266)
Visitor Counter : 199