ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
सध्याच्या खरीप विपणन हंगाम 2020-21मध्ये गेल्या वर्षीच्या याच काळाच्या तुलनेत तांदूळ खरेदीत 33 % वाढ
खरीप विपणन हंगाम 2020 साठी तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा, गुजरात, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि आंध्रप्रदेशला डाळी आणि तेलबियांच्या खरेदीला परवानगी
Posted On:
08 OCT 2020 7:55PM by PIB Mumbai
2020-21 खरीप विपणन हंगामाची आवक आधीच सुरु झाली असून सरकारने 2020-21 खरीप पिकाची,सध्याच्या किमान आधारभूत किंमतीनुसार, आधीच्या हंगामाप्रमाणे, शेतकऱ्यांकडून खरेदी सुरु ठेवली आहे.
2020-21 खरीप विपणन हंगामाच्या तांदूळ खरेदीने वेग घेतला असून केरळ सारख्या इतर राज्यात खरेदी सुरु झाली असून ज्या राज्यात खरेदी सुरु आहे अशा राज्यातही खरेदीने वेग घेतला आहे. यामुळे, देशातल्या 1.7 लाख शेतकऱ्यांकडून, 3847.05 कोटी रुपये किमान आधारभूत किंमतीच्या 20,37,634 मेट्रिक टन तांदळाची खरेदी करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या याच काळाच्या तुलनेत तांदूळ खरेदीत 33 % इतकी मोठी वाढ झाली आहे.
राज्यांकडून आलेल्या प्रस्तावानुसार, खरीप विपणन हंगामासाठी तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा, गुजरात, उत्तर प्रदेश, आंध्रप्रदेश आणि हरियाणा या राज्यांसाठी 30.70 लाख मेट्रिक टन डाळी आणि तेलबियांच्या खरेदीला मंजुरी देण्यात आली आहे. याशिवाय 1.23 लाख मेट्रिक टन खोबरे खरेदीला आंध्रप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळसाठी मंजुरी देण्यात आली आहे. इतर राज्ये/केंद्र शासित प्रदेशांसाठी डाळी आणि तेलबिया, खोबरे यासाठी प्रस्ताव आल्यानंतर, किंमत सहाय्य योजनेंतर्गत मंजुरी देण्यात येईल.
07.10.2020 पर्यंत केंद्र सरकारने नोडल एजन्सीद्वारे 376.65 मेट्रिक टन मुगाची खरेदी केली. किमान आधारभूत किंमत 2.71 कोटी रुपये असलेल्या या मुग खरेदीतून तामिळनाडू आणि हरियाणातल्या 269 शेतकऱ्यांना लाभ झाला. त्याचप्रमाणे किमान आधारभूत किंमत 52.40 कोटी रुपये असलेल्या 5089 मेट्रिक टन खोबऱ्याची खरेदी करण्यात आली त्याचा कर्नाटक आणि तामिळनाडू मधल्या 3961 शेतकऱ्यांना लाभ झाला. आंध्रप्रदेश, कर्नाटक,तामिळनाडू आणि केरळसाठी 1.23 लाख मेट्रिक टनची मंजुरी देण्यात आली होती.खोबरे आणि उडीद यांचे दर किमान आधारभूत किंमतीनुसार किंवा त्यापेक्षा जास्त आहेत.संबंधित राज्ये मुग आणि इतर खरीप डाळी आणि तेलबियांच्या खरेदीला सुरवात करण्यासाठी व्यवस्था करत आहेत.
2020-21 च्या खरीप विपणन हंगामासाठी कापूस खरेदीला 1 ऑक्टोबर 2020 पासून सुरुवात झाली. भारतीय कापूस महामंडळाने 7 ऑक्टोबर 2020 पर्यंत 994.28 लाख रुपये किमान आधारभूत किमतीचा 3525 गाठी कापूस खरेदी केला असून त्याचा 753 शेतकऱ्याना लाभ झाला आहे.
****
B.Gokhale/N.Chitale/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1662846)
Visitor Counter : 145