भूविज्ञान मंत्रालय
हवामान शास्त्र विभागाच्या नव्या उपक्रमांची हितसंबंधीयांना माहिती
वादळ धडकणे, तीव्रता आणि खराब हवामान, जसे मुसळधार पाऊस, जोरदार वारे आणि वादळ यांचा मागोवा घेणे आणि अंदाज व्यक्त करण्याच्या हवामान शास्त्र विभागाच्या कामात लक्षणीय सुधारणा- डॉ मृत्युंजय मोहपात्रा, महासंचालक, आयएमडी
Posted On:
08 OCT 2020 6:01PM by PIB Mumbai
भारतीय हवामानशास्त्र विभागाने, हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक, डॉ. मृत्युंजय मोहपात्रा यांच्या अध्यक्षतेखाली आज वादळपूर्व ऑनलाईन बैठक आयोजित केली होती. ऑक्टोबर- डिसेंबर 2020 या वादळ काळातील तयारी, गरजांचा आढावा घेणे आणि त्याची योजना बनवणे तसेच आयएमडी च्या विविध उपक्रमांची माहिती, हितसंबंधी व्यक्ती आणि संस्थांना देणे हा या बैठकीचा उद्देश होता.
आयएमडी चे महासंचालक डॉ. मोहपात्रा यांनी यावेळी बैठकीची सुरुवात करतांना हवामानाशी संबंधित विविध मुद्दे आणि शेवटच्या टोकापर्यंत संपर्क यंत्रणा पोहोचवण्यासारख्या अनेक मुद्दयांना स्पर्श केला तसेच, ज्या ज्या क्षेत्रात सुधारणा आवश्यक आहेत अशा क्षेत्रांवरही चर्चा केली. हवामानाचा माग घेणे, वादळ धडकण्याची वेळ, त्याची तीव्रता आणि खराब हवामान, जसे की मुसळधार पाउस, जोरदार वारे आणि वादळ अशा सर्वांचा अंदाज बांधण्याच्या भारतीय हवामान विभागाच्या क्षमतेत लक्षणीय सुधारणा झाली आहे, असे त्यांनी सांगितले. वादळाच्या काळापूर्वी आयएमडी संवादात्मक दर्शनी व्यवस्था लावेल, ज्यावर हवामानाच्या स्थितीचे आणि अंदाजाचे निरीक्षण करता येईल तसेच वादळाची दिशा आणि तीव्रता पण जीआयएस प्लॅटफॉर्मवर बघता येईल, असे त्यांनी सांगितले.
आयएमडीने हवामानासंदर्भात अनेक मोबाईल अॅप्स विकसित केले आहेत. ज्यात विजेची सूचना देण्यासाठी ‘दामिनी’, हवामानाची सूचना देण्यासाठी ‘मौसम’ आणि ‘उमंग’-यात वादळाचीही पूर्वसूचना दिली जाईल. तसेच ‘मेघदूत’ अॅप कृषीहवामानविषयक सल्ले देण्यासाठी विकसित करण्यात आले आहे.
प्रदेशिक हवामान विशेष केंद्र (RSMC) येथे मोफत नोंदणी सुविधा उपलब्ध असून www.rsmcnewdelhi.imd.gov.in या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी केल्यास शेतकऱ्यांना वादळाविषयी अद्ययावत सूचना मिळू शकतील, असेही त्यांनी सांगितले.
आपल्याला भूतकाळापासून शिकण्याची गरज असून, वारंवार होत असलेल्या चुका टाळायला हव्यात, असेही त्यांनी सांगितले.आपल्याला सर्व हितसंबंधीयांच्या सहकार्याने एक अचूक अंदाज बांधणारी हवामान शास्त्र व्यवस्था विकसित करावी लागेल, ज्यामुळे, भविष्यात आपण जीवित आणि वित्तहानी कमीतकमी होईल, अशी दक्षता घेऊ शकू, असेही डॉ. मोहपात्रा म्हणाले.
****
B.Gokhale/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1662788)
Visitor Counter : 123