ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालय
डॉ जितेंद्र सिंह यांच्या हस्ते अमिताभ बच्चन यांची प्रस्तावना असलेले आणि पेंग्विन प्रकाशनाच्या ‘डिस्कव्हरींग द हेरीटेज ऑफ आसाम’ या कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन
Posted On:
04 OCT 2020 8:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 ऑक्टोबर 2020
केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) ईशान्य प्रांत विकास आणि पंतप्रधान कार्यालय; कार्मिक सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन, अणु ऊर्जा आणि अंतराळ खात्याचे राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी आज अमिताभ बच्चन यांची प्रस्तावना असलेले आणि पेंग्विन प्रकाशनाच्या ‘डिस्कव्हरींग द हेरीटेज ऑफ आसाम’ या कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन केले.
ग्लेझ पेपरवरील चित्रे आणि छायाचित्रे असलेले कॉफी टेबल पुस्तक ईशान्येकडील सर्वात मोठ्या राज्यातील विविध वंशीय जमाती आणि उप-जमातींचा वारसा, विश्वास, श्रद्धा आणि परंपरा यांचे एक आकर्षक संकलन आहे.
पुस्तक प्रकाशनाप्रसंगी डॉ जितेंद्र सिंह यांनी लेखक पद्मपानी बोरा (भारतीय महसूल सेवा-2009 तुकडी) यांचे अभिनंदन केले. बोरा यांनी ईशान्यकेडील विविध विषयांवर लेखन करुन प्रस्थापित लेखक म्हणून लौकिक कमावला आहे.
डॉ जितेंद्र सिंह म्हणाले, बरेचजण असे सुचवतात की, ईशान्य प्रदेशाला भारताच्या उर्वरीत भागाच्या जवळ आणावे, पण फार कमी लोकांना समजते की, उर्वरीत भारताला ईशान्येकडील प्रदेशापासून बरेच काही शिकण्यासारखे आहे. पद्मपानी बोरा यांच्या पुस्तकामुळे आसामच्या भव्य वैभवाविषयी आणि अज्ञात पैलूविषयी समजून घेण्यास मदत होईल.
डॉ जितेंद्र सिंह यांनी सुचवले की, कॉफी टेबल पुस्तक सर्वदूर प्रसिद्ध व्हावे आणि आशा व्यक्त केली की बोरा यांचे लिखाण केवळ पुस्तकाच्या पानांवर मर्यादीत राहणार नाही तर उर्वरित जगासाठी ईशान्येकडील सांस्कृतिक वारशाचे राजदूत म्हणून काम करेल.
* * *
B.Gokhale/S.Thakur/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1661639)
Visitor Counter : 146