विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
तांदळावरील रोगांवर लसीच्या दिशेने प्रयत्न सुरु
डॉ. ताई लावण्या आणि त्यांची चमू नवीन रोग नियंत्रण रणनीती विकसित करीत आहेत जी तांदळाची प्रतिकारक शक्ती सक्रिय करणारी लस म्हणून वापरता येईल
Posted On:
04 OCT 2020 7:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 ऑक्टोबर 2020
तांदळाची प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी लवकरच लस तयार होईल. डॉ ताई लावण्या यांनी धानाशी संपर्क येऊन रोग निर्माण करणाऱ्या झू (झँथोमोनास ऑरिझापी ऑरिझा) या सूक्ष्मजंतूचा शोध लावला आहे.
डॉ ताई लावण्या हैदराबाद येथील उस्मानिया विद्यापीठात सेंटर फॉर मोलेक्युलर बायोलॉजी विभागात कार्यरत आहेत. त्यांना केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाची डिएसटी-इन्सपाअर फॅकल्टी फेलोशिप प्राप्त झालेली आहे. त्यांनी त्यांच्या चमूसह धान पेशीभित्तिकांवर प्रभाव करणाऱ्या झू बॅक्टेरियम किंवा काही रेणू ओळखण्यासाठी आणि विकसित करण्यावर संशोधन करत आहेत.
ही चमू नवीन रोग नियंत्रण रणनीती विकसित करीत आहे ज्याचा उपयोग ते धानाची रोगप्रतिकारक शक्ती सक्षम करणारी लस म्हणून करु शकतील आणि रोगजनूकांच्या संक्रमणापासून धानाच्या रोपांना प्रतिकार करण्याची शक्ती मिळेल.
झँथोमोनास ऑरिझापी ऑरिझामुळे जगभरात तांदूळ उत्पादनाचे मोठे नुकसान होते.
डॉ. लावण्या यांच्या नेतृत्वाखालील चमूने ‘झू’ ने स्त्राव केलेल्या वनस्पती पेशीभित्तिकावरील निकृष्ट एन्झाईम्सवर बायोकेमिकल आणि फंक्शनल अभ्यास केला, ज्यातून झू रोगजनूकांच्या धान रोपाच्या संपर्कात येऊन रोगाशी संबंधित असलेल्या यंत्रणेविषयी माहिती मिळते.
डॉ लावण्या यांच्या मते, या अभ्यासामुळे तांदूळ संरक्षण प्रतिसादाचे नोवेल इलिसिटर्स उघडकीस आणेल आणि वनस्पती-रोगजनक परस्परसंवादाच्या मूलभूत बाबींबद्दल नवीन ज्ञान प्रदान करेल ज्यामुळे किमान अर्धे जग अवलंबून असलेल्या पिकाचे नुकसान कमी होईल.
[For more details, Dr Tayi Lavanya (tayi.lavanya3[at]gmail[dot]com) can be contacted].
* * *
B.Gokhale/S.Thakur/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1661622)
Visitor Counter : 242