ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
किमान आधारभूत किंमतीने तांदूळ खरेदी करुन 41,084 शेतकऱ्यांना 1,082 कोटी रुपये प्रदान केले
2020-21 वर्षातील खरीप विपणन हंगामासाठीची कापूस खरेदी किमान आधारभूत किंमतीने सुरू
Posted On:
04 OCT 2020 6:26PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 ऑक्टोबर 2020
धान उत्पादक राज्यांमध्ये 2020-21 च्या हंगामासाठी तांदूळ खरेदी सुरू झाली. 03 ऑक्टोबर पर्यंत 2020-21 हंगामाची एकूण तांदूळ खरेदी 5,73,339 मेट्रिक टन इतकी झाली आहे. या खरेदीचा 41,084 शेतकऱ्यांना लाभ झाला असून त्यासाठी त्यांना आतापर्य़ंत हमीभावापोटी 1,082.464 कोटी रुपये देण्यात आले आहेत.
2020-21 खरीप हंगामासाठीची कापूस खरेदी 1 ऑक्टोबर 2020 पासून सुरू झाली. भारतीय कापूस महामंडळाने 3 ऑक्टोबरपर्यंत एकूण 147 गासड्या कापूस हमीभावाने खरेदी केला आणि त्यापोटी 40.80 लाख रुपये प्रदान केले. 29 शेतकऱ्यांना याचा लाभ झाला.
* * *
S.Thakur/V.Sahajrao/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1661598)
Visitor Counter : 132