आयुष मंत्रालय

आयुष क्षेत्रासाठीची उदयोन्मुख आयटी जाळेव्यवस्था-आयुष ग्रीडचे राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियानात औपचारिक एकत्रीकरण होणार

Posted On: 02 OCT 2020 6:08PM by PIB Mumbai

 

आयुष क्षेत्रांसाठीची माहिती तंत्रज्ञान जाळ्याची व्यवस्था 'आयुष ग्रीड' आज या क्षेत्राचा आधारस्तंभ ठरली असून, या व्यवस्थेला लवकरच राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियानाशी (NDHM) जोडले जाणारा आहे. आयुष मंत्रालयाचे सचिव राजेश कोटेचा, यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या आयुष विभागाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आयुष ग्रीडचा चमू आणि NDHM यांच्यात या प्रस्तावावर अनेकदा चर्चा झाली असून, या विलीनीकरणासाठी काय काय करता येईल, याचाही निर्णय घेण्यात आला आहे. या विलीनीकरणामुळे जनतेला विविध आरोग्यविषयक सुविधांचा वापर करणे अत्यंत सोयीचे होईल. तसेच, आयुषअंतर्गत च्या वैद्यकीय शाखांना आरोग्यव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या कामालाही गती मिळेल. 

यावेळी, सचिवांनी आयुष ग्रीड प्रकल्पांतर्गत सुरु असलेल्या माहिती-तंत्रज्ञान उपक्रमांचाही आढावा घेतला. गेल्या दोन वर्षात आयुष ग्रीडमुळे आयुष क्षेत्र आणि डिजिटल व्यवस्थेतील दरी भरुन निघण्यास तसेच आरोग्य क्षेत्रासाठी महत्वाचे असे प्रकल्प राबवण्यात मदत झाल्याचे निरीक्षण, यावेळी नोंदवण्यात आले.

आयुष मंत्रालयाने 2018 साली संपूर्ण आयुष क्षेत्राला माहिती तंत्रज्ञानाचा आधार देण्यासाठी हा उपक्रम सुरु केला. संपूर्ण आयुष क्षेत्राच्या डिजिटलीकरणामुळे आरोग्यक्षेत्रात सर्व स्तरात मोठे परिवर्तन येईल, यात संशोधन, शिक्षण, विविध आरोग्य कार्यक्रमांची अंमलबजावणी आणि औषध नियमन, या सर्वांचा समावेश आहे. ही व्यवस्था आयुष विभागाच्या सर्व हितसंबंधी गटांसाठी लाभदायक ठरेल. त्याशिवाय, आरोग्य क्षेत्रात, विविध राष्ट्रीय आणि जागतिक उद्दिष्टे साध्य करण्यातही यामुळे मदत होईल.  

या प्रकल्पाअंतर्गत, आजवर राबवण्यात आलेल्या सर्वात महत्वाच्या उपक्रमांपैकी एक म्हणजे आयुष आरोग्य व्यवस्थापन माहिती यंत्रणा (AHMIS). चेन्नई इथल्या सिद्धा संशोधन परिषदेने THERAN हा आरोग्य व्यवस्थापन माहिती यंत्रणा प्रकल्प आता एक अत्यंत गतिमान असा क्लाउड आधारित माहिती यंत्रणा झाली असून आयुष मंत्रालयाच्या सुमारे 100 वैद्यकीय संस्था याचा वापर करत आहेत.त्याशिवाय, भारत इलेक्ट्रोनिक्स लिमिटेडच्या सेवादेखील यांच्याशी संलग्न करण्यात आल्या आहेत. त्याशिवाय केंद्र सरकारच्या क्षेत्राबाहेर देखील आयुष विभागांमध्ये AHMIS च्या यंत्रणेचा विस्तार करण्याची योजना आहे.

आयुष ग्रीडचे आणखी एक यश म्हणजे, मंत्रालयाच्या विविध विभागांच्या गरजांनुसार, आयुष संजीवनी मोबाईल एप आणि योग लोकेटर एप विकसित करणे.

हे दोन्ही ऐप आजवर 6 लाख लोकांनी डाऊनलोड केले आहेत. कोविड च्या सुरुवातीच्या काही आठवड्यात, कोविडविषयक माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि आयुष स्वयंसेवकांना एकत्र आणण्यासाठी मंत्रालयाने विविध क्लाउड सोर्सिंग कामे केली. त्याशिवाय, कोविड-19 च्या डॅश बोर्डवर अद्ययावत माहिती तयार ठेवण्यात आली. आयुष ग्रीड प्रकल्पामुळे लॉकडाऊनच्या काळातही विविध आरोग्यविषयक यंत्रणा राबवण्यात मदत झाली.

आयुष ग्रीड अंतर्गत, आयुष व्यवसायिकांसाठी त्यांच्या गरजांनुसार, पुण्याच्या C-DAC सोबत एक संयुक्त  आय टी अभ्यासक्रम देखील विकसित करण्यात आले. त्यात सुमारे 200 व्यावसायिकांनाही प्रशिक्षण देण्यात आले. यामुळे, आयुष क्षेत्र आणि डिजिटल व्यवस्थेमधील दरी दूर होण्यात मदत झाली आहे. त्याशिवाय  C-DAC सोबतच, आयुष ग्रीडने एक नोव्हेंबरला सिद्धा व्यवस्थेचा भाग म्हणून प्रायोगिक तत्वावर, टेलीमेडिसिनचा कार्यक्रम देखील सुरु केला. लॉकडाऊनच्या काळापासून, ही व्यवस्था होमियोपॅथी आणि आयुर्वेदिक सल्ला व उपचारांसाठी देखील लागू आहे. सुमारे 20,000 लोकांना त्याचा लाभ झाला आहे.

आयुष शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आयुष नेक्स्ट हा महत्वाकांक्षी प्रकल्पही सुरु करण्यात आला हे. विकसित झाल्यावर हा कार्यक्रम ऑनलाईन सुरु होईल.

आयुष ग्रीड उपक्रमातील घटक, आयुषच्या सर्व क्षेत्रांना स्पर्श करणारे ठरेल.

आयुष ग्रीडच्या विविध उपक्रमांमार्फत या व्यवस्थेचा विकास होत आहे. येत्या 3 वर्षात ही व्यवस्था, 8 लाख आयुष वैदयकीय तज्ञ आणि 50 कोटी नागरिकांना उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा आहे.

 

R.Tidke/R.Aghor/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1661052) Visitor Counter : 271