ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
एक देश एक रेशन कार्ड योजनेअंतर्गत राष्ट्रीय पोर्टेबिलिटी समूहात तामिळनाडू आणि अरुणाचल प्रदेश आज जोडली गेली
Posted On:
01 OCT 2020 10:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 ऑक्टोबर 2020
एक देश एक रेशन कार्ड योजने अंतर्गत, 26 राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांच्या राष्ट्रीय पोर्टेबिलिटी समूहात आज तामिळनाडू आणि अरुणाचल प्रदेश ही दोन राज्ये आज जोडली गेली आहेत. ई पीओएस सोफट वेअर अद्ययावत करणे, केंद्रीय आयएम- पीडीएस आणि अन्न वितरण पोर्टलशी जोडणी, राष्ट्रीय पोर्टेबिलिटी व्यवहारासाठी आवश्यक चाचणी इत्यादीसह एकीकृत होण्यासाठीची आवश्यक तयारी या दोन राज्यात आधीच पूर्ण झाली होती. यामुळे एक देश एक रेशन कार्ड योजने अंतर्गत,आता 28 राज्ये/ केंद्रशासित प्रदेश परस्परांशी जोडले गेले आहेत. सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे स्थलांतरित लाभार्थी या 28 राज्ये/ केंद्रशासित प्रदेशात, 1 ऑक्टोबर 2020 पासून त्याच प्रमाणात धान्य घेऊ शकतात.
या राज्यातले लाभार्थी एनएफएसए अंतर्गत त्यांच्या वाट्याचे धान्य, त्यांचे सध्याचे रेशन कार्ड वापरून ई पीओएस उपकरणावर आधार प्रमाणीकरणासह देशातल्या कोणत्याही ई पीओएस दुकानातून घेऊ शकतात.
आंध्रप्रदेश, बिहार, दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव, गोवा, गुजरात, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, कर्नाटक, केरळ, पंजाब, राजस्थान, मिझोरम, ओडिशा, स्क्किम, तेलंगण, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, जम्मू काश्मीर, मणिपूर, नागाल्यांड, उत्तराखंड, लक्षद्वीप आणि लडाख या 26 राज्ये/ केंद्रशासित प्रदेशात ही सुविधा उपलब्ध आहे. उर्वरित राज्ये/ केंद्रशासित प्रदेश मार्च 2021 पर्यंत राष्ट्रीय पोर्टेबिलिटीशी एकीकृत करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
* * *
B.Gokhale/N.Chitale/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1660838)
Visitor Counter : 162