गृह मंत्रालय
कुवेतचे राजे महामहीम, आमिर शेख सबाह अल-अहमद-अल-जाबेर अल-सबाह यांच्या निधनामुळे त्यांच्या सन्मानार्थ दिनांक 4 ऑक्टोबर 2020 रोजी एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा पाळला जाणार
Posted On:
01 OCT 2020 7:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 ऑक्टोबर 2020
कुवेतचे राजे महामहीम आमीर शेख सबाह अल-अहमद-अल-जाबेर अल-सबाह यांचे दिनांक 29 सप्टेंबर 2020 रोजी निधन झाले.निधन झालेल्या उच्चपदस्थ महामहीम यांना आदरांजली देण्यासाठी म्हणून भारत सरकारद्वारे दिनांक 4 ऑक्टोबर 2020 रोजी देशभरात एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा पाळण्यात येणार आहे.
या दिवशी देशभरातील सर्व शासकीय इमारतींवर, जिथे राष्ट्रध्वज फडकत असतो,तो अर्ध्या उंचीवर उतरविण्यात येईल आणि कोणताही अधिकृत करमणूकीचा कार्यक्रम होणार नाही.
* * *
B.Gokhale/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1660740)
Visitor Counter : 105