युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्री किरेन रीजीजू यांच्या हस्ते ‘साई’म्हणजेच भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या नव्या ‘लोगो’चे उद्घाटन, यातून साईचे क्रीडाक्षेत्राला प्रोत्साहन देण्यातील योगदान व्यक्त-किरेन रीजीजू
Posted On:
30 SEP 2020 7:47PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 सप्टेंबर 2020
केंद्रीय क्रीडा आणि युवक व्यवहार मंत्री, किरेन रीजीजू यांच्या हस्ते दिल्लीच्या मेजर ध्यानचंद मैदानावर आज भारतीय क्रीडा प्राधिकरण-साईच्या नव्या लोगोचे उद्घाटन झाले. क्रीडा सचिव रवी मित्तल, भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष नरिंदर बात्रा आणि साईचे महासंचालक संदीप प्रधान यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्याशिवाय, अनेक क्रीडापटू, प्रशिक्षण आणि इतर क्रीडा रसिक ऑनलाईन स्वरुपात या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
साई च्या लोगोच्या महत्वाविषयी बोलतांना किरेन रीजीजू म्हणाले, की, ‘साई संघटना ही क्रीडा व्यवस्थेतील अग्रणी संस्था आणि देशातील क्रीडा नैपुण्याला प्रोत्साहन देणारी प्राथमिक संघटना आहे. या संघटनेने ऍथलिटना आवश्यक तो सर्व पाठींबा देत त्यांची क्रीडा कारकीर्द घडवण्यासाठी आणि आपापल्या क्षेत्रात यशाची नवी शिखरे गाठण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. साईने आजवर अनेक खेळाडू घडवले आहेत, अशा शब्दांत त्यांनी या संघटनेचे कौतुक केले. साई हे नावच देशातील सर्वोच्च क्रीडा प्राधिकरणाची ओळख सांगण्यासाठी पुरेसे आहे. या संस्थेच्या नव्या लोगो मध्ये भारताचा तिरंगा आणि चरख्याचा निळा रंग यांचा समावेश आहे, ज्यातून भारतीय क्रीडाविश्वात साई ने मिळवलेले नाव आणि राष्ट्रीय गौरवाची ओळख पटते.ही संस्था जगात भारताच्या क्रीडाविश्वाचे नेतृत्व करते.
साई संघटना तिच्या स्थापनेपासूनच देशाच्या क्रीडाक्षेत्रातील मध्यवर्ती संघटना राहिली असून, तिचा लोगो, तिचे स्थान आणि आजवरचा प्रवास विशद करणारा आहे.
B.Gokhale/R.Aghor/ P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1660429)
Visitor Counter : 138