अर्थ मंत्रालय

2020-21 या वित्तीय वर्षासाठी केंद्र सरकारच्या वित्तीय लेखाजोख्याचा ऑगस्ट महिन्यापर्यंतचा मासिक आढावा

Posted On: 30 SEP 2020 7:32PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  30 सप्टेंबर  2020

2020-21 या वित्तीय वर्षासाठी केंद्र सरकारच्या वित्तीय लेखाजोख्याचा ऑगस्ट महिन्यापर्यंतचा मासिक आढावा एकत्रित करण्यात आला असून अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. याची प्रमुख वैशिष्ट्ये अशी आहेत-

केंद्र सरकारला ऑगस्ट 2020 पर्यंत 3,77,306 कोटी रुपये प्राप्त झाले.

(अर्थसंकल्पीय अनुमान 2020-21 च्या एकूण प्राप्तीच्या तुलनेत 16.80 %) यामध्ये 2,84,495 कोटी रुपये कर महसूल, 86,147 कोटी बिगर कर महसूल आणि 6,664 कोटी रुपये बिगर कर्ज भांडवली उत्पन्न यांचा समावेश आहे.या 6,664 कोटी रुपयांमध्ये कर्जाची वसुली (6,635 कोटी) आणि निर्गुंतवणूकीतून प्राप्त झालेल्या (29 कोटी )रुपयांचा समावेश आहे.

या काळापर्यंत केंद्र सरकारने राज्य सरकारांना कराचा हिस्सा या रूपाने 2,17,976 कोटी रुपये हस्तांतरित केले आहेत जे गेल्या वर्षीच्या तुलनेत 37,629 कोटी रुपयानी कमी आहेत.

केंद्र सरकारने 12,47,653 कोटी रुपये( अर्थसंकल्पीय अनुमान 2020-21च्या 41.01 % ) खर्च केला असून त्यापैकी 11,13,206 कोटी रुपये महसूल खाते आणि 1,34,447 कोटी रुपये भांडवली खात्यावर करण्यात आला आहे. एकूण महसूल खर्चापैकी 2,37,662 कोटी रुपये व्याज देण्यासाठी आणि 1,30,700 कोटी रुपये महत्वाच्या अनुदानासाठी खर्च करण्यात आले आहेत.

 

 

M.Chopade/N.Chitale/ P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1660426)