कृषी मंत्रालय
सरकारकडून पंजाब आणि हरियाणातील 84.60 कोटी रुपये किंमतीच्या 44,809 मेट्रीक टन धानाची खरेदी
प्रविष्टि तिथि:
30 SEP 2020 7:08PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 सप्टेंबर 2020
खरीप विपणन हंगाम 2020-21 ला नुकतीच सुरुवात झाली आहे आणि सरकारने गेल्या हंगामाप्रमाणेच 2020-21 साठी शेतकऱ्यांकडून खरीप हंगाम पिकांची खरेदी अस्तित्वात असलेल्या किमान आधारभूत किंमतीप्रमाणे केली आहे.
राज्यांकडून आलेल्या प्रस्तावांनुसार, खरीप विपणन हंगाम 2020 साठी तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगण आणि हरियाणा राज्यांच्या 14.09 लाख मेट्रीक टन तेलबियांच्या खरेदीला मंजूरी देण्यात आली आहे. इतर राज्ये / केंद्रशासित प्रदेशांचे खरीप डाळी आणि तेलबियांचे प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर मान्यता देण्यात येईल आणि अधिसूचित हंगामाच्या कालावधीत बाजार दर एमएसपीच्या खाली गेला तर मुल्य समर्थन योजने (पीएसएस) नुसार एफएक्यू ग्रेडची खरेदी केली जाईल.
29.09.2020 पर्यंत, सरकारने नोडल संस्थांमार्फत 33 लाख रुपये किंमतीचा 46.35 मेट्रीक टन मूग खरेदी केला आहे. याचा तामिळनाडूमधील 48 शेतकऱ्यांना लाभ झाला असुन 52.40 कोटी किमान आधारभूत मुल्याचे 5089 मेट्रीक टन सुके खोबरे (बारमाही पीक) खरेदी केले आहे. याचा कर्नाटक आणि तामिळनाडूमधील 3961 शेतकऱ्यांना लाभ झाला आहे. ही खरेदी आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ राज्यातील 1.23 लाख मेट्रीक टन या मंजूर प्रमाणापेक्षा जास्त आहे.
हरियाणा आणि पंजाब राज्यांसाठी खरीप विपणन हंगाम 2020-21 ची खरेदी 26 सप्टेंबरपासून सुरु झाली आहे. 29.09.2020 पर्यंत हरियाणातील 3,506 मेट्रीक टन आणि पंजाबमधील 41,303 मेट्रीक, अशी एकूण 44,809 मेट्रीक टन, प्रतिक्विंटल 1888 दराने 84.60 कोटी रुपयांच्या एमएसपी मुल्याची खरेदी झाली आहे. याचा हरियाणा आणि पंजाबमधील 2950 शेतकऱ्यांना लाभ झाला आहे.
2020-21 हंगामासाठी कापूस खरेदी 1 ऑक्टोबर 2020 पासून सुरु होणार आहे. भारतीय कापूस महामंडळाकडून (सीसीआय) एफएक्यु प्रतिच्या कापसाची खरेदी 1 ऑक्टोबर 2020 पासून सुरु होणार आहे.
B.Gokhale/S.Thakur/ P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1660416)
आगंतुक पटल : 186