अवजड उद्योग मंत्रालय

केंद्रीय सार्वजनिक आस्थापनांची उलाढाल, कार्यक्षमता आणि नफा वाढवण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न: प्रकाश जावडेकर

Posted On: 30 SEP 2020 4:38PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  30 सप्टेंबर  2020

 

सध्याच्या कोविड आजाराच्या काळात, केंद्रीय सार्वजनिक आस्थापनांनी पार पाडलेल्या भूमिकेचे कौतुक करत, केंद्रीय अवजड उद्योग आणि सार्वजनिक आस्थापना विभागाचे मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे, की, या सार्वजनिक आस्थापना देशासाठी अभिमानाची बाब असून, त्यांची कार्यक्षमता, उलाढाल आणि नफा मिळवण्याची क्षमता वाढवण्यासाठी, सरकार प्रयत्न करत आहे.

जावडेकर आणि या खात्याचे राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या हस्ते आज, आत्मनिर्भर, स्वयं-पुनरुत्थान आणि कणखर भारत या शीर्षकाच्या पुस्तकाचे प्रदर्शन झाले, त्यावेळी ते बोलत होते. या सार्वजनिक आस्थापनांनी कोविडच्या काळात दिलेल्या योगदानाविषयी हे माहिती संकलन आहे. (ई-पुस्तक संकलन)

सार्वजनिक आस्थापनांनी कोविडच्या काळात केलेल्या कामांचे जावडेकर यांनी कौतुक केले. कोविडच्या काळात, वीजपुरवठा 99 टक्के होता, 24,000 गॅस सिलेंडर वितरक, 71,000 किरकोळ दुकाने सुरु होती, 6,500 एसकेओ डीलर्स सतत लोकांची सेवा करण्यास तत्पर आणि उपलब्ध होते असं जावडेकर म्हणाले.

या संकटकाळातही, वस्तूंची वाहतूक 100 टक्के आणि वस्तूंचे उत्पादन देखील 100 टक्के ठेवल्याबद्दल देखील त्यांनी या सार्वजनिक आस्थापनांचे कौतुक केले. या काळात सुमारे 71 कोटी सिलेंडर्सचा पुरवठा करण्यात आला, तेल विपणन कंपन्यांनी ग्राहकांना एप्रिल ते जून या काळात 21 कोटी मोफत गॅस सिलेंडर रिफील केले, त्याशिवाय 13,000 कोटी रुपयांची आर्थिक मदतही केली.’ असे जावडेकर म्हणाले. 33 दशलक्ष मेट्रिक टन मालाची वाहतूक करण्यात आली. आणि केंद्रीय सार्वजनिक कंपन्यांनी विविध ठिकाणी कोविड रुग्णांवर उपचारासाठी 201 रुग्णालयांमध्ये सुमारे 11,000 खाटा देखील दिल्या, असेही जावडेकर म्हणाले. 

सध्या जेव्हा देशात सगळ्या गोष्टी हळुहळू पूर्ववत सुरु करण्याची प्रक्रिया सुरु आहे आणि आपण ‘आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल करतो आहोत, अशावेळी सार्वजनिक कंपन्यांचे महत्व अधिकच वाढले असून, या कंपन्यांनी आपली 90 टक्के क्षमतेने उत्पादन सुरु केल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

आज देशभरात, 249 केंद्रीय सार्वजनिक आस्थापना कार्यरत असून त्यांची वार्षिक उलाढाल, 25 लाख कोटींपेक्षा अधिक आहे. तसेच त्यांचा निव्वळ नफा, 1.75 लाख कोटी इतका आहे, त्यांचे लाभांश, व्याज, कर आणि जीएसटी या सगळ्या मार्फत या कंपन्या 3.62 लाख करोड रुपये अदा करतात, आणि दरवर्षी कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीच्या रूपाने 3,500 कोटी रुपये सामाजिक कार्यांसाठी खर्च करत असतात अशी माहिती जावडेकर यांनी दिली.

 

 

M.Chopade/R.Aghor/ P.Malandkar

 

 

 

 

 



(Release ID: 1660309) Visitor Counter : 147