कोळसा मंत्रालय
कोळसा खाण लिलाव: ऑफलाइन-प्रत्यक्ष लिलाव प्रस्ताव
Posted On:
29 SEP 2020 7:32PM by PIB Mumbai
कोळसा मंत्रालयाने दि. 18 जून, 2020 रोजी 38 कोळसा खाणींच्या लिलावाची प्रक्रिया सुरू केली आहे. व्यावसायिक खाणींच्या 11व्या शृंखलेतले, हे लिलाव सीएम (एसपी) कायदा, 2015, अन्वये होणार आहेत. आणि पहिल्या शृंखलेतले लिलाव एमएमडीआर कायदा, 1957 अन्वये होणार आहे. या लिलावासाठी बोली लावण्याची अंतिम तारीख 29.09.2020 (दुपारी 2.00 वाजेपर्यंत) आहे.या लिलावामध्ये सहभागी होण्यासाठी आत्तापर्यंत 46 कंपन्यांनी 82 बोलींचे प्रस्ताव सादर कले आहेत. या बोली ऑफलाइन असून, कार्यालयामध्ये प्रत्यक्ष सादर करण्यात आल्या आहेत. या बोली 23 कोळसा खाणी-ब्लॉक्ससाठी असून त्या अधिसूचित प्राधिका-यांकडे सादर केल्या आहेत. तसेच आणखी दोन बोली 20 कोळसा खाणींसाठी आल्या आहेत.
----
B.Gokhale/S.Bedekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1660125)
Visitor Counter : 138