संरक्षण मंत्रालय

डिफेन्स इंडिया स्टार्ट अप चॅलेंज- 4 चा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते प्रारंभ


संरक्षण स्टार्ट अप परिसंस्था म्हणजे आत्मनिर्भर भारत अभियानासाठी स्वयंपूर्णता साध्य करण्याच्या दिशेने निर्धारपूर्वक पाऊल – राजनाथ सिंह

Posted On: 29 SEP 2020 7:17PM by PIB Mumbai

 

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज संरक्षण सर्वोत्कृष्टतेसाठी नवोन्मेश, आयडीईएक्स कार्यक्रमात, नवी दिल्लीत डिफेन्स इंडिया स्टार्ट अप चॅलेंज - 4 चा प्रारंभ केला. जवानांसाठी आणि आयडीईएक्स फॉर  फौजी आणि उत्पादन व्यवस्थापन दृष्टीकोन मार्गदर्शक तत्त्वेही यावेळी जारी करण्यात आली.

भारतीय सैन्य दलाच्या जवानांच्या नवोन्मेशाला चालना देण्यासाठी आयडीईएक्स फॉर फौजी हा अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम आहे. सीमेवर आणि इतर ठिकाणी 13 लाख  कर्मचारी सेवेत असून अतिशय प्रतिकूल हवामानात काम करत संबंधित साधनांचा उपयोग करतात,यापैकी अनेकांकडे यामध्ये सुधारणेसाठी नाविन्यपूर्ण  कल्पना असतील मात्र  त्यांना चालना देण्यासाठी कोणतीही यंत्रणा नव्हती हे लक्षात घेऊन हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. यामुळे जवानांसाठी हे नवे दालन  खुले होणार असून नवोन्मेशाचा भाग होऊन  त्याची दखल घेण्यात येऊन त्यासाठी त्यांना गौरवण्यात येणार आहे.

हा उपक्रम म्हणजे देशात अतिशय प्रभावी आणि  सुनियोजित संरक्षण स्टार्ट अप परिसंस्था  निर्माण करण्यासाठी आणि आत्मनिर्भर भारत अभियानासाठी स्वयंपूर्णता साध्य करण्याच्या दिशेने निर्धारपूर्वक पाऊल असल्याचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले.आपली  संरक्षण प्रणाली अधिक बळकट करण्यासाठी आणि स्वयंपूर्ण करण्यासाठी खाजगी क्षेत्राचा सहभागही महत्वाचा आहे. यासाठी खाजगी क्षेत्रासमवेत भागीदारी, तंत्रज्ञान हस्तांतरण, ऑटोमॅटिक मार्गाने 74 %थेट परकीय गुंतवणूक आणि आयातीसाठी प्रतिबंधित 101 बाबींची नुकतीच जारी केलेली सूची यासारखी पावले उचलण्यात आल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले. 

तंत्रज्ञानविषयक आवश्यकता पूर्ण करण्यासाठी जवानांनी संरक्षण नवोन्मेश  संस्था मंचाचा उपयोग करावा आणि भारतीय स्टार्ट अपनी या संधीचा उपयोग करत संरक्षण सक्षमतेचा अविभाज्य भाग व्हावे असे आवाहन त्यांनी केले.

 संरक्षण राज्य मंत्री श्रीपाद नाईक, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत,संरक्षण सचिव डॉ अजय कुमार यांनी संबोधित केले. 

डिफेन्स इंडिया स्टार्ट अप  चॅलेंज -4 अंतर्गत सशस्त्र दल,ओएफबी आणि डीपीएसयु द्वारे 11 चॅलेंज संभाव्य स्टार्ट अप,नवोन्मेशी, एमएसएमई  यासाठी खुली करण्यात आली असून त्यांच्याकडून संरक्षण क्षेत्रात उपयोगी ठरणाऱ्या तंत्रज्ञानाबाबत नाविन्यपूर्ण कल्पना अपेक्षित आहेत.

 

M.Iyangar/N.Chitale/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1660121) Visitor Counter : 288