गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय

31 हजार कोटीहून जास्त मूल्याच्या प्रकल्पांसाठी पंधरा हजार कोटी पेक्षा जास्त कर्ज  NCRPB ने मंजूर केले.


हमीची वैधता संपुष्टात आल्याबद्दल पोर्टल स्वतःहून नोटीस पाठवते

NCRPB कडून P-MIS पोर्टल लॉंच

सॉफ्टवेअरमधील उत्तम पारदर्शकता आणि जबाबदार व्यवस्थापनाद्वारे माहितीचे संरक्षण

Posted On: 29 SEP 2020 3:31PM by PIB Mumbai

 

प्रकल्प व्यवस्थापन माहिती सेवा (P-MIS) हे डिजीटल / मोबाईल तंत्रज्ञान वापराद्वारे सर्व प्रकल्पांची प्रगती आणि कर्जपुरवठा यासंबधी पारदर्शकता तसेच अधिक जबाबदार व्यवस्थापन या  सुधारणांच्या  दृष्टीने उपयुक्त ठरणारे महत्वाचे पाउल आहेअसे प्रतिपादन गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार खात्याचे सचिव दुर्गाशंकर मिश्रा यांनी केले. ते आज नवी दिल्ली येथे प्रकल्प व्यवस्थापन माहिती सेवा (P-MIS) च्या उद्धाटनप्रसंगी बोलत होते. कोविड कालखंडात वेळेवर गरजेनुसार हे पोर्टल दिल्याबद्दल मिश्रा यांनी NCRPB ला धन्यवाद दिले.

NCRPB ने राष्ट्रीय राजधानीत अनेक स्थानिक आणि उपस्थानिक योजनांना मंजुरी दिल्याची माहिती  दुर्गाशंकर मिश्रा यांनी दिली. यासाठी लागणारा निधी जमा करण्यासाठी बाजारातील बाँड द्वारे वा काही काही एजन्सीद्वारे कर्ज घेतले जाईल. 31 हजार कोटीहून जास्त  मुल्यांच्या प्रकल्पांसाठी पंधरा हजार कोटी पेक्षा जास्त कर्ज  NCRPB ने मंजूर केले.   18,500 कोटीहून जास्त मूल्यांचे 265 प्रकल्प पूर्ण झाले, तर काही अजून बांधकामाच्या टप्प्यात आहेत. असे त्यांनी स्पष्ट केले.  P-MIS  प्रकल्पाचे व्यवस्थापन तसेच आढावा घेण्याच्या दृष्टीने उपयुक्त असून त्यामधून मिळणारी माहिती आणि फीडबॅक नागरिकांना निर्णय घेण्यास उपयुक्त ठरतो. P-MIS ही एनसीआरपीने स्वतः तयार केलेली सिस्टीम असून एनआयसी सर्व्हरवर ती ठेवली आहे.

या सॉफ्टवेअरच्या वैशिष्ट्यांबद्दल सांगताना मिश्रा म्हणाले की हमी वैधता आणि कर्जाची मासिक देय रक्कम यासाठी वेगवेगळे हिशोब बॅकग्राउंडला करून हे सॉफ्टवेअर ई-मेल मध्ये त्यासाठीचे अलर्ट पाठवते.

गृहनिर्माण सचिवांनी सांगितले की इथे असलेल्या माहितीची गुप्तता राखली जाते तसेच एकदा दिलेल्या  माहितीमध्येही  NCRPB चे FAO किंवा अध्यक्ष (A&F)  यांच्या मंजूरीशिवाय कोणालाही बदल करता येत नाही.

 

U.Ujagare/V.Sahajrao/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1660019) Visitor Counter : 138