श्रम आणि रोजगार मंत्रालय
ईपीएस-1995 अंतर्गत योजनांच्या प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याची सुविधा आता 'उमंग' ॲप्लिकेशनवर उपलब्ध
उमंग ॲपवर ईपीएफओ सेवांचा सर्वाधिक लोकांनी घेतला लाभ
Posted On:
28 SEP 2020 10:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 सप्टेंबर 2020
कोविड-19 साथीच्या काळात घरबसल्या सोयीस्कर पद्धतीने काम करण्यासाठी, EPF म्हणजेच कर्मचारी भविष्यनिर्वाह निधीच्या सदस्यांसाठी 'उमंग' (UMANG) अर्थात- नव्या युगातील प्रशासनासाठी एकीकृत मोबाइल ॲप्लिकेशन - याचा मोठा वापर केला आहे. उमंग ॲपवर आधी असलेल्या 16 सेवांमध्ये आणखी भर घालत ईपीएफओने कर्मचारी भविष्यनिर्वाह निधीच्या सदस्यांना, कर्मचारी निवृत्तीवेतन योजना- 1995 करिता योजना प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
उमंग ॲपच्या माध्यमातून या योजना प्रमाणपत्रासाठी अर्ज करणे सोपे असल्याने आता सदस्यांना त्या अर्जासाठी प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही. तसेच यामुळे अनावश्यक कागदपत्रांबाबतचे काम वाचविणे शक्य होईल. या सुविधेमुळे 5.89 कोटींपेक्षा अधिक सदस्यांना फायदा होऊ शकेल. उमंग ॲपवर ही सुविधा मिळवण्यासाठी, चालू असलेला UAN म्हणजे सार्वत्रिक खाते क्रमांक आणि EPFO कडे नोंदित असलेला मोबाईल क्रमांक असणे पुरेसे आहे.
याद्वारे थेट ग्राहकांपर्यंत अद्ययावत तंत्रज्ञान पोहोचविले जात आहे. उमंग अॅपवर EPFO ही सर्वात लोकप्रिय सुविधा म्हणून कायम आहे. या अॅपवर ऑगस्ट 2019 पासून 47.3 कोटी जणांनी हजेरी लावली असून यापैकी 41.6 कोटी अर्थात 88% जणांनी ईपीएफओ सेवांसाठी या अॅपचा वापर केला आहे.
S.Thakur/J.Waishampayan/ P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1659895)
Visitor Counter : 178