ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय

उर्वरित सर्व राज्यांमध्ये आजपासून धान/तांदळाची मुदतपूर्व खरेदी


प्रथमच श्रेणी-अ साठी FRK आणि सुरक्षित साठवणुकी योग्य तांदळाच्या खरेदीसाठी निकष आज जारी

प्रविष्टि तिथि: 28 SEP 2020 7:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  28 सप्टेंबर  2020

अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने आता उर्वरित सर्व खरेदीदार राज्यांना 2020-21 च्या खरीप विपणन हंगामासाठी धान /तांदूळ खरेदी प्रक्रिया 28 सप्टेंबर 2020 पासून सुरु करण्याची संमती दिली आहे. मात्र, केरळातील खरेदी हंगामाची सुरुवात (21.09.2020 पासून) आणि पंजाब व हरिणामधील सुरुवात (26.09.2020 पासून) यात कोणताही बदल होणार नाही. यामुळे, हमीभावाने आपला शेतमाल झटपट विकणे शेतकऱ्यांना शक्य होणार आहे.

अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने, 2020-21 च्या खरीप विपणन हंगामात केंद्रीय साठा तयार करण्याच्या दृष्टीने खरेदी करण्यासाठी, अन्नधान्यांकरिता एकसमान तपशील अटी जारी केल्या आहेत. प्रघातानुसार, या तपशील अटी, धन/ तांदळासह अन्य भरड धान्यासाठी- ज्वारी, बाजरी, मका आणि नाचणी- जारी करण्यात आल्या आहेत. या अटींमध्ये, TPDS म्हणजे लक्ष्यनिर्दिष्ट सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत व अन्य कल्याणकारी योजनांच्या अंतर्गत राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना देण्याच्या तांदळावरील प्रमाणकांचाही समावेश आहे.

श्रेणी-अ च्या FRK म्हणजे सुरक्षित तांदूळ बियाणेसाठी आणि सुरक्षित भातसाठ्याच्या खरेदीसाठी तांदूळ विषयक तपशील अटी यावेळी प्रथमच जाहीर करण्यात आल्या. सदर एकसमान तपशील अटींना मोठी प्रसिद्धी देऊन शेतकऱ्यांपर्यंत त्या पोहोचविण्याची विनंती राज्य सरकारांना करण्यात येत आहे- जेणेकरून त्यांना त्यांचा शेतमालाला  उचित भाव मिळेल तसेच कोणताही माल अस्वीकृत केला जाणार नाही. सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना व भारतीय अन्न महामंडळाला असे सुचविण्यात येत आहे की- 2020-21 च्या खरीप विपणन हंगामात सदर तपशील अटींचे काटेकोर पालन करीतच खरेदी होईल, याची खबरदारी घ्यावी. भारतीय अन्न महामंडळ आणि राज्य प्रापण संस्थांना, प्रापण प्रक्रिया विना-अडथळा पार पाडण्याचे व शेतकऱ्यांना हमीभावाने पैसे दिले जाण्याची दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

 

 

M.Iyengar/J.Waishampayan/ P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1659808) आगंतुक पटल : 253
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Manipuri , Assamese , Punjabi , Tamil , Telugu , Malayalam