आयुष मंत्रालय

आयुष मंत्र्यांनी प्रक्रिया व्यवस्थापन केंद्राची पायाभरणी केली आणि जम्मू - काश्मिरमध्ये 21 आयुष आरोग्य आणि निरामय केंद्रांचा ई - शुभारंभ

Posted On: 26 SEP 2020 3:43PM by PIB Mumbai

 

आयुषचे केंद्रिय राज्यमंत्री (स्वतंत्र अधिभार) श्री श्रीपाद नाईक आणि पंतप्रधान कार्यालय आणि पूर्वोत्तर विभाग विकास मंत्रालयाचे केंद्रिय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते भदेरवाह येथे औषधी रोपांच्या प्रक्रिया व्यवस्थापन केंद्राचा पायाभरणी सभारंभ झाला आणि जम्मू काश्मिर येथे 21 आयुष आरेग्य आणि निरामय केंद्रांचा उद्घाटन समारंभ व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून 25 सप्टेंबर 2020 रोजी झाला.

औषधी वनस्पतींसाठी प्रक्रिया व्यवस्थापन केंद्र स्थापन करण्याचा उद्देश म्हणजे स्थानिक लोकांकडून उत्पादित आणि संकलित केलेले विलग करणे, प्रक्रिया करणे, प्रमाणिकरण करणे, पॅकेजिंग आणि सुरक्षितपणे औषधी वनस्पतींची साठवण करणे जेणेकरून त्याची गुणवत्ता वाढेल आणि चांगली किंमत मिळू शकेल आणि संबंधित शेतकऱ्यांचे उत्पन्न देखील वाढू शकेल.

समारंभादरम्यान, आयुष्मान भारत योजनेअंतर्गत जम्मू काश्मिर येथे 21 आयुष आणि निरामय केंद्रांचे देखील उद्घाटन करण्यात आले. या केंद्रांद्वारे आजाराचा तणाव आणि आर्थिक खर्च कमी करण्यासाठी समग्र कल्याणकारी मॉडेल तयार केले जाईल. आयुष हस्तक्षेपाचे मुख्य उद्दिष्ट निरोगी जीवनशैली, अन्न, योग आणि औषधी वनस्पतींद्वारे रोग रोखण्यासाठी जनतेला `सेल्फ केअर`साठी (स्वतः काळजी घेण्यास) सक्षम करणे हेच आहे.

श्री श्रीपाद नाईक हे त्यांच्या भाषणात म्हणाले, जम्मू काश्मिर प्रांतातील भदेरवाह येथील औषधी वनस्पतींचे ``प्रक्रिया व्यवस्थापन केंद्र `` हे या भागातील लोकांची दीर्घ काळापासून असलेली मागणी आणि हिमालयी औषधी वनस्पतींच्या प्रजातींच्या लागवडीतील प्रदेशातील मोठ्या संभाव्यतेवर प्रकाश टाकणारे आहे. केंद्र पुरस्कृत कार्यक्रम राबविण्याच्या केंद्रशासित प्रदेश सरकारच्या अधिकाऱ्यांच्या कष्टाचे मंत्र्यांचे कौतुक केले आणि सांगितले की, विकासाची गती वाढविण्यासाठी जम्मू काश्मिर हे भारत सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे.

भाषणादरम्यान डॉ. जितेंद्र सिंह यांनी, हे प्रक्रिया व्यवस्थापन केंद्र हे तरूणांना रोजगार देणाऱ्या, शेतकऱ्यांना पुरविल्या जाणाऱ्या इतर सोयी सुविधांव्यतिरिक्त मोठे रोजगार केंद्र बनेल आणि औषधी वनस्पतींचे संकलक ठरेल, असे त्यांनी ठळकपणे सांगितले. पुढे त्यांनी आयुष आरोग्य आणि निरामय कार्यक्रम गरजू लोकांना सेवा तर देणारच तसेच आयुषला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रोत्साहित करण्याचेही त्यांनी भर देऊन सांगितले.

...........

R.Tidke/S.Shaikh/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1659298) Visitor Counter : 181