सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
जागतिक दर्जाच्या ‘सेंटर फॉर डिसएबिलिटी स्पोर्ट्स’ चा ग्वाल्हेरमध्ये पायाभरणी सोहळा
Posted On:
25 SEP 2020 8:01PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 सप्टेंबर 2020
दिव्यांग क्रीडापटूंसाठी जागतिक दर्जाच्या ‘सेंटर फॉर डिसएबिलिटी स्पोर्ट्स’ चा ग्वाल्हेरमध्ये पायाभरणी सोहळा, सामाजिक आणि न्याय मंत्रालयाकडून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पार पडला. कृषी आणि शेतकरी कल्याण, ग्रामविकास, पंचायत राज आणि अन्न प्रक्रिया उद्योग खात्याचे मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांच्यासह इतर मान्यवरांची याप्रसंगी उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना नरेंद्र सिंग तोमर म्हणाले, सध्या देशात दिव्यांग क्रीडापटूंसाठी प्रशिक्षण सुविधा उपलब्ध नाही. प्रस्तावित केंद्राच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी विशेष प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील. या केंद्राच्या स्थापनेमुळे दिवांगजनात समाजाशी जोडले जाण्याची भावना विकसित होईल.
ग्वाल्हेरमध्ये दिव्यांगांसाठी क्रीडा केंद्र स्थापन करण्यास केंद्रीय मंत्रीमंडळाने 28 फेब्रुवारी 2019 रोजी मंजूरी दिली होती. या केंद्रासाठी 170.99 कोटी रुपये प्रस्तावित खर्च आहे. सोसायटी नोंदणी अधिनियम, 860 अंतर्गत या केंद्राची नोंदणी होईल. या केंद्राच्या एकंदरीत पर्यवेक्षण आणि देखरेखीसाठी डीईपीडब्ल्यूडीचे सचिव यांच्या अध्यक्षतेखाली नियामक मंडळाची स्थापना केली आहे.
दिव्यांग खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करण्यासाठी आणि देशाचा गौरव वाढवण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा या केंद्रावर पुरविल्या जातील. आऊटडोअर अॅथलेटीक स्टेडिअम, इनडोअर स्पोर्टस कॉम्प्लेक्स, बेसमेंट पार्किंग सुविधा, 2 जलतरण तलाव, वर्गखोल्यांसह उच्च कार्यक्षमता केंद्र, वैद्यकीय सुविधा, क्रीडा विज्ञान केंद्र, खेळाडूंसाठी वस्तिगृह सुविधा, लॉकर्स, भोजनव्यवस्था, मनोरंजन सुविधा आणि प्रशासकीय ब्लॉक या सुविधा असतील.
* * *
B.Gokhale/S.Thakur/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1659144)
Visitor Counter : 110