सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय

खादी आणि ग्रामोद्योग आयोगाकडून फॅशन आयकॉन सुनील सेठी यांची सल्लागारपदी नियुक्ती

Posted On: 25 SEP 2020 6:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 सप्‍टेंबर 2020


खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने भारतीय फॅशन जगतातील आघाडीचे व्यक्तीमत्व सुनील सेठी यांची सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. सेठी केव्हीआयसीला तयार वस्त्रांसाठी नवनवीन डिझाईन आणि खादीचा देशात आणि देशाबाहेर प्रसार करण्याबाबत सल्ला देतील.

सुनील सेठी यांची नियुक्ती एक वर्षासाठी आहे. याअगोदर रितू बेरी केव्हीआयसीच्या सल्लागारपदी होत्या, त्यांचा कार्यकाल नुकताच संपला.

सुनील सेठी यांचा फॅशन जगतात चार दशकांचा अनुभव आहे. त्यांच्या नियुक्तीने खादीचा देशात आणि देशाबाहेर प्रसार होण्यास मदत होईल, असे केव्हीआयसीचे अध्यक्ष विनय कुमार सक्सेना म्हणाले.

केव्हीआयसी पंतप्रधानांनी दिलेल्या ‘लोकल टू ग्लोबल अँड व्होकल फॉर लोकल’ हे धोरण भारतीय उत्पादन क्षेत्रात लागू करणार आहे.  


* * *

B.Gokhale/S.Thakur/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1659093) Visitor Counter : 101