रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
हायड्रोजन इंधन सेल्सवर आधारित वाहनांच्या सुरक्षिततेच्या मूल्यांकनासाठी मानके
Posted On:
24 SEP 2020 4:23PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 सप्टेंबर 2020
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 23 सप्टेंबर 2020 रोजी केंद्रीय मोटार वाहन अधिनियम 1989 मध्ये दुरुस्ती करून हायड्रोजन इंधन सेलद्वारे चालणाऱ्या मोटार वाहनांच्या सुरक्षिततेच्या मूल्यांकनाची मानके अधिसूचित केली आहेत. स्वच्छ ऊर्जेवर चालणाऱ्या वाहनांमध्ये वाढ व्हावी यासाठी नियम विस्तृत केले गेले आहेत.
यामुळे देशातील ऊर्जा कार्यक्षम आणि पर्यावरणास अनुकूल अशा हायड्रोजन इंधन सेल आधारित वाहनांच्या प्रोत्साहनाला बळ मिळेल.
अशा वाहनांच्या संभाव्य उत्पादक आणि पुरवठा करणाऱ्यांकडे अशा वाहनांच्या चाचणीसाठी मानके उपलब्ध आहेत. ही सर्व मानके उपलब्ध आंतरराष्ट्रीय मानकांच्या तोडीची आहेत.
B.Gokhale/S.Tupe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1658679)
Visitor Counter : 209