रेल्वे मंत्रालय

भारतीय रेल्वे सर्वत्र "स्वच्छता  पंधरवडा "पाळणार


रेल्वे मंडळाने ,संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम यांच्या सहयोगाने स्वच्छता आणि पर्यावरण या विषयावर केले  वेबिनारचे आयोजन

Posted On: 20 SEP 2020 1:26PM by PIB Mumbai

 

स्वच्छतेचे काटेकोरपणे पालन आणि रेल्वे स्थानकांमध्ये प्लास्टिक कचरा व्यवस्थापनाला केंद्रस्थानी ठेवून निर्जंतुकीकरण करत , रेल्वेगाड्या, रेल्वेमार्ग, वसाहती आणि इतर रेल्वे आस्थापनांच्या स्वच्छतेची मोहीम सुरू झाली आहे.

येत्या 16 ते 30  सप्टेंबर 2020 या कालावधीत भारतीय रेल्वेद्वारे  सर्वत्र स्वच्छता पंधरवड्याचे पालन करण्यात येत आहे. स्वच्छतेचे काटेकोरपणे पालन करतरेल्वे स्थानकांमध्ये प्लास्टिक कचरा व्यवस्थापनाला केंद्रस्थानी ठेवून निर्जंतुकीकरण करत , रेल्वे स्थानके,रेल्वेगाड्या, रेल्वेमार्ग, वसाहती आणि इतर रेल्वे आस्थापनांच्या स्वच्छतेची मोहीम सुरू झाली आहे.मास्क्स आणि सँनिटायझरचे वाटप करण्यात येत आहे.रेल्वेच्या हद्दीत स्वच्छता पालनासाठी आणि सुरक्षिततेसाठी माहिती, शिक्षण, संपर्क (Information, Education,Communication, IEC) या  त्रिसूत्रीचा वापर जनजागृती करण्यासाठी केला जात असून कोविड-19 बाबत  घेण्याची काळजी आणि वेबिनार्सही आयोजित केल्या आहेत. या काळात रेल्वेने रेल्वेमार्ग, स्थानके, नाले,स्वच्छतागृहे,आवारे इत्यादींची स्वच्छता करण्यावर अधिक भर दिला आहे.

रेल्वे मंडळाच्या उत्तर रेल्वे विभागाने संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या सहयोगाने "स्वच्छता आणि पर्यावरण" या विषयावर दिनांक16 सप्टेंबर 2020 रोजी एका वेबिनारचे आयोजन केले होते. या वेबिनारमधे सरकारी ,खाजगी  तसेच अशासकीय संस्थांमधील प्रसिद्ध वक्ते आणि पर्यावरण तज्ञांनी भाग घेऊन सहभागी सदस्यांना संबोधित केले होते. यावेळी घनकचरा व्यवस्थापन, पाण्याची बचत आणि ऊर्जा संवर्धन, भारतीय रेल्वेची स्वच्छ भारत मिशन मोहीमेसोबतची केंद्राभिमुखता, हरीत रेल्वे स्थानक मूल्यांकन ,प्लास्टिक कचऱ्याविरुध्द लढाई तसेच  चक्रीय अर्थव्यवस्थेचे विविध पैलू  या विषयांवर विशेष भर देण्यात आला.

 

R.Tidke/S.Patgoankar/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1656920) Visitor Counter : 202