पंतप्रधान कार्यालय
राज्यसभा खासदार अशोक गस्ती यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांना शोक
Posted On:
17 SEP 2020 11:57PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 सप्टेंबर 2020
राज्यसभेचे खासदार अशोक गस्ती यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.
‘‘राज्यसभेमध्ये खासदार असलेले अशोक गस्ती हे कर्नाटकात पक्षाला बळकट करण्यासाठी परिश्रम घेणारे समर्पित कार्यकर्ता होते. समाजातल्या आर्थिकदृष्टया दुर्बल आणि उपेक्षित घटकांच्या सबलीकरणासाठी ते निरंतर कार्य करीत होते. त्यांच्या निधनामुळे आपल्याला अतिशय दुःख झाले आहे. त्यांचा परिवार आणि स्नेहीजनांविषयी संवेदना. ओम शांती’’, असे पंतप्रधानांनी शोकसंदेशात म्हटले आहे.
* * *
U.Ujgare/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1656090)
Visitor Counter : 106
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam