कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय

कोविड-19 दरम्यान निवृत्तीवेतनधारकांच्या कल्याणासाठी उपाययोजना

Posted On: 17 SEP 2020 7:36PM by PIB Mumbai

 

कोविड-19 काळात निवृत्तीवेतनधारकांच्या कल्याणासाठी अनेक उपाययोजना हाती घेण्यात आल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) ईशान्य प्रांत विकास; राज्यमंत्री पंतप्रधान कार्यालयकार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन; अणु ऊर्जा आणि अंतराळ डॉ जितेंद्र सिंग यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात दिली.  

कोविड-19 महामारीमुळे टाळेबंदी लागू करण्यात आली, तेंव्हापासूनच निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाने निवृत्तीवेतनधारकांसाठी विविध योजना राबवल्या, ज्यामुळे वेळेत निवृत्तीवेतन आणि निवृत्ती लाभ मिळून कोविड--19 च्या काळात त्यांना आरोग्यदायी ठेवता येईल.

 

काही प्रमुख उपाययोजना:

· विभागाने 20 शहरांतील निवृत्तीवेतनधारकांसाठी एम्सचे संचालक डॉ रणदीप गुलेरिया यांच्यासमवेत टेलि-संवादाचे आयोजन करण्यात आले होते. निवृत्तीवेतनधारकांच्या मनातील कोविड-19 विषयीची भीती दूर करण्यासाठीच्या सर्व मुद्यांवर चर्चा करण्यात आली.

· प्रतिबंधात्मक-आरोग्य काळजी म्हणून 20 शहरांतील निवृत्तीवेतनधारकांसाठी योग सत्राचे आयोजन करण्यात आले होते.

· निवृत्तीवेतन वेळेत अदा होण्यासाठी ज्याठिकाणी पेन्शन पेमेंट ऑर्डर जारी करण्यात आली मात्र, टाळेबंदीमुळे सीएपीओकडे पाठवली नाही, त्याठिकाणी लेखा नियंत्रक यांच्याकडून आवश्यक ती कार्यवाही करण्यात आली.  

· सीसीएस (निवृत्तीवेतन) नियम, 1972, मधील कलम 64 मध्ये सुट देण्यात आली. कोविड संकटात एखादा कर्मचारी त्याचे देयके अंतिम करु शकला नाही किंवा निवृत्तीवेतन दावा अर्ज पूर्ण करु शकला नाही तरीही त्याला निवृत्तीवेतनाचे लाभ मिळावे यासाठी तात्पुरती मंजुरी.

· ई-पीपीओ (इलेक्ट्रॉनिक पेन्शन पेमेंट ऑर्डर) डिजीलॉकरसोबत जोडण्यात आली. यामुळे डिजीलॉकरमध्ये पीपीओ नोंदी कायमस्वरुपी केल्या जातील आणि निवृत्तीवेतनधारकांना आपल्या पीपीओची प्रत तात्काळ मिळू शकेल.

· कोविड-19 संक्रमणाचा ज्येष्ठ नागरिकांना असलेला धोका लक्षात घेता हयातीचे प्रमाणपत्र सादर करण्याच्या तारखेत सुट देण्यात आली. निवृत्तीवेतनधारक आता 1 नोव्हेंबर 2020 ते 31 डिसेंबर 2020 या दरम्यान हयातीचे प्रमाणपत्र सादर करु शकतील. तथापी, 80 वयोगटातील निवृत्तीवेतनधारकांना हयातीचे प्रमाणपत्र 1 ऑक्टोबर 2020 ते 31 डिसेंबर 2020 या काळात सादर करता येईल.

*****

B.Gokhale/S.Thakur/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1655807) Visitor Counter : 179