महिला आणि बालविकास मंत्रालय

बालकांसाठी हेल्पलाईन सेवा

Posted On: 17 SEP 2020 7:07PM by PIB Mumbai

 

सध्या, चाईल्डलाईन सेवा 594 जिल्ह्यांमध्ये उपलब्ध आहे. 01.01.2018 पर्यंत ही सेवा केवळ 413 जिल्ह्यांमध्ये उपलब्ध होती. 15.09.2020 पर्यंत या सेवेचा 594 जिल्ह्यांपर्यंत विस्तार करण्यात आला आहे. चाईल्ड हेल्पलाईनसाठी सरासरी प्रतीक्षा वेळ/ कालावधी विशिष्ट वेळी कॉलच्या रहदारीवर अवलंबून असतो. चाईल्डलाईन टीमला एखाद्या घटनेची तक्रार मिळाल्यानंतर 60 मिनिटांत घटनास्थळी पोहोचणे अनिवार्य आहे. तथापि, वास्तविक प्रतिसाद वेळ भौगोलिक स्थिती (डोंगरी प्रदेश, मेट्रो शहरे), वाहनांची उपलब्धता यावर अवलंबून आहे. तसेच, चाईल्डलाइनच्या फेररचनेवर विचार करण्यासाठी महिला आणि बालकल्याण राज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे.

जानेवारी 2018 ते ऑगस्ट 2020 दरम्यान बालकांसाठीच्या हेल्पलाईन क्रमांकावर आलेल्या कॉल्सची संख्या पुढीलप्रमाणे:

 

महिना

वर्ष

 

2018

2019

2020

Total

जानेवारी

9,35,360

6,20,412

5,63,388

21,19,160

फेब्रुवारी

9,17,267

5,61,646

7,20,696

21,99,609

मार्च

12,07,811

7,09,259

9,83,513

29,00,583

एप्रिल

11,85,119

7,16,081

5,86,195

24,87,395

मे

12,38,908

7,37,926

5,27,210

25,04,044

जून

11,12,714

6,85,078

4,91,963

22,89,755

जुलै

9,17,996

7,19,803

4,82,570

21,20,369

ऑगस्ट

7,73,779

6,29,987

4,62,743

18,66,509

सप्टेंबर

7,77,332

6,40,516

-

14,17,848

ऑक्टोबर

7,75,404

6,51,753

-

14,27,157

नोव्हेंबर

7,49,671

5,98,162

-

13,47,833

डिसेंबर

6,96,316

5,94,046

-

12,90,362

एकूण

1,12,87,677

78,64,669

48,18,278

2,39,70,624

 

 

 

केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री श्रीमती स्मृती इराणी यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

****

M.Chopade/S.Thakur/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1655773) Visitor Counter : 97