आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड – 19 संसर्ग तपासणी सुविधा केंद्रे

Posted On: 15 SEP 2020 6:39PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  15 सप्टेंबर  2020

 

केंद्र सरकारच्या वैद्यकीय संशोधन विभागाच्या अखत्यारीतील ICMR अर्थात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद या स्वायत्त संस्थेने, मार्च 2020 ते जुलै 2020 या पाच महिन्यांच्या कालावधीत देशभरात उभारल्या गेलेल्या अधिकृत कोविड- 19 संसर्ग तपासणी सुविधा  केंद्रांची आकडेवारी प्रसिध्द केली आहे. त्यानुसार मार्च महिन्यात देशात 152 अधिकृत तपासणी केंद्रे होती. एप्रिलमध्ये त्यांची संख्या वाढून 247 झाली. त्यापाठोपाठ मे महिन्यात 275, जून महिन्यात 367 तर जुलै महिन्यात देशात 298 अधिकृत कोविड-19 विषाणू तपासणी सुविधा केंद्रे कार्यरत होती.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी मंगळवारी राज्यसभेत दिलेल्या लिखित उत्तरात ही माहिती दिली आहे.  

या कालावधीत महाराष्ट्रातील तपासणी सुविधा केंद्रांची आकडेवारी लक्षात घेतली तर मार्चमध्ये राज्यात 19 केंद्रे उभारली गेली तर एप्रिलमध्ये जवळजवळ दुप्पट म्हणजे 36 अधिकृत तपासणी केंद्रे कार्यरत होती. मे महिन्यात 23 केंद्रांमध्ये तपासणी सुरु होती तर जूनमध्ये राज्यातील वाढता विषाणू संसर्ग लक्षात घेता, केंद्रांची संख्या वाढवून 32 करण्यात आली. जुलै महिन्यात राज्यात कोविड- 19 विषाणू संसर्ग तपासणीसाठी 21 अधिकृत सुविधा केंद्रांमध्ये तपासणी सुरु होती.  

 

B.Gokhale/S.Chitnis/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1654646) Visitor Counter : 139