उपराष्ट्रपती कार्यालय

सावधगिरीच्या अभूतपूर्व उपाययोजनांसह संसदेच्या बहुप्रतिक्षित पावसाळी अधिवेशनाला सुरुवात

प्रविष्टि तिथि: 14 SEP 2020 8:02PM by PIB Mumbai

 

कोविड-19 साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर सावधगिरीच्या अभूतपूर्व उपाययोजनांसह संसदेच्या बहुप्रतिक्षित पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. राज्यसभा अध्यक्ष एम वेंकैया नायडू यांनी सदस्यांना अर्थपूर्ण चर्चा करून सर्वसहमतीने निर्णय घेऊन वेळेचा अधिकाधिक वापर करण्याची विनंती केली. 

सदस्यांना शारीरिक अंतराच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे शक्य व्हावे यासाठी भारतीय संसदेच्या इतिहासात प्रथमच, राज्यसभा आणि लोकसभा सभागृहे एकाच वेळी एका सदनाच्या कामकाजासाठी वापरली जात आहेत. राज्यसभा कक्ष, सज्जा (गॅलरी) आणि लोकसभा कक्ष राज्यसभेच्या कामकाजासाठी वापरले जात आहेत. 

आपल्या सुरुवातीच्या वक्तव्यात  नायडू यांनी सभागृहासमोरील प्रमुख मुद्द्यांकडे  लक्ष वेधले आणि सर्व सदस्यांना कार्यवाही सुरळीत पार पाडण्याचे आवाहन केले. साथीच्या आजाराचे व्यवस्थापन, अर्थव्यवस्थेचे पुनरुज्जीवन आणि सामान्य सामाजिक जीवन पुन्हा सुरळीत सुरु करण्यासंदर्भात  लोकांना त्यांच्याकडून बहुमूल्य मार्गदर्शनाची अपेक्षा आहे याची त्यांनी आठवण करून दिली.

18 सत्रांच्या संक्षिप्त अधिवेशनाचा संदर्भ देताना नायडू यांनी कोविड-19 साथीच्या आजारासह देशातील महत्वपूर्ण कायदे आणि मुद्यांवर अर्थपूर्ण चर्चा करण्याला प्राधान्य दिले जावे यावर भर दिला.

प्रवास निर्बंध शिथिल झाल्यावर विभाग संबंधित स्थायी समित्यांनी काम सुरू केल्याचे सांगून  नायडू म्हणाले की त्यांनी आंतर-सत्राच्या कालावधीत साथीच्या आजाराचे विविध पैलू आणि त्याच्या  परिणामांची तपासणी केली. राज्यसभेच्या अशा सात समित्यांनी यावर्षी जुलैपासून 26 बैठका घेतल्या असून साथीच्या आजाराचे पैलू, त्याचे परिणाम आणि व्यवस्थापनावरील विविध बाबींवर एकूण  56 तास 40 मिनिटे चर्चा केली आहे.

अध्यक्षांच्या असे निदर्शनाला आले कीपहिल्यांदा राज्यसभेच्या 8 विभागीय स्थायी समित्यांची उपस्थिती 50 टक्क्यांहून अधिक होती – 2019-20 दरम्यान (सप्टेंबर 2019 - मार्च 2020) ही 50.73 होती. 2017-18 मध्ये ती 44.87% होती.

सभागृहाने 14 व्या राज्यसभेचे उपाध्यक्ष म्हणून हरिवंश यांची निवड केली. अध्यक्षांनी नवनिर्वाचित उपसभापतींचे  अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

****

M.Chopade/S.Mhatre/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1654197) आगंतुक पटल : 139
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Manipuri , Punjabi , Telugu