पर्यटन मंत्रालय

देखो अपना देश वेबिनार मालिकेअंतर्गत पर्यटन मंत्रालयाकडून ‘इन द फुट स्टेप्स ऑफ बुद्ध ‘ वेबिनार सादर

Posted On: 14 SEP 2020 3:17PM by PIB Mumbai

 

भारत आणि बौद्ध धर्म यांचे घनिष्ठ नाते आहे. या धर्माच्या भारतातल्या पाऊलखुणा प्रसिद्ध  असून जगभरात त्या भारतातले बौद्ध मंडल म्हणून प्रसिद्ध आहेत. बौद्ध धर्म आणि आणि भगवान बुद्ध यांच्या जीवनाशी संबंधित अनेक स्थळे असून ती भारतभरात आहेत. भगवान बुद्ध यांचे जीवन आणि शिकवण यांच्याशी निगडीत या स्थळांना भेट देण्याची जगभरातल्या बौद्ध धर्मीयांची साहजिकच इच्छा असते.

पर्यटन मंत्रालयाने 12 सप्टेंबर 2020 ला देखो अपना देश वेबिनार मालिके अंतर्गत इन द फुट स्टेप्स ऑफ बुद्ध वेबिनार सादर केला. शाक्यमुनी बुद्ध द्वारा  व्यक्ती, कुटुंब आणि समाजाच्या दुःखावर मात आणि आनंद आणण्यावर हा वेबिनार केंद्रित होता.

बुद्धांच्या शिकवणीत ज्यांना रुची आहे त्यांनी बुद्धांच्या जीवनाशी संबंधित ठिकाणाची तीर्थ यात्रा केल्यास त्यांच्यासाठी ते अतिशय उपयोगाचे ठरेल असे बुद्धांनी देह  नश्वर होण्यापूर्वी सुचवले होते. देखो अपना देश वेबिनार मालिका म्हणजे एक भारत श्रेष्ठ भारत अंतर्गत भारताच्या समृध्द विविधतेचे  दर्शन घडवण्याचा एक प्रयत्न आहे.

बुद्धपथ / अहिंसा ट्रस्ट चे संस्थापक, मार्गदर्शक श्री धर्माचार्य शांतुम यांनी वेबिनार मध्ये सहभागी झालेल्यांना मार्गदर्शन केले. भगवान बुद्ध यांना आत्मज्ञान प्राप्त झाले ते बोधगया, राजगिर इथले ध्यान धारणा स्थळ, श्रावस्ती, बालपण व्यतीत झाले ते कपिलावास्तू, सारनाथ इथले डीअर  पार्क, जिथे त्यांनी पहिली शिकवण दिली, आणि कुशीनगर जिथे त्यांचे निर्वाण झाले या स्थळांच्या आभासी प्रवासाचे  सादरीकरण करत त्यांनी मार्गदर्शन केले. धर्माचार्य शांतुम यांनी बुद्धांच्या जीवन आणि शिकवणीबाबत  कथा सांगत त्यांचे जीवन आणि त्यांची  शिकवण समजण्यासाठी मार्गदर्शन केले.

वेबिनारचा समारोप करताना, अतिरिक्त महासंचालक रुपिंदर ब्रार यांनी आयआरसीटीसी कडून चालवल्या जाणाऱ्या  महापरीनिर्वाण एक्सप्रेस या प्रसिद्ध बौद्धधर्म पर्यटन रेल्वेविषयी माहिती दिली. भगवान बुद्धांच्या महापरीनिर्वाण सूत्र यावरून हे नाव देण्यात आले आहे.ही गाडी प्रवाश्यांना  बौद्धधर्म धर्माची शिकवण जाणून घेण्या साठी मदत करणारा प्रवास घडवते. इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान  मंत्रालयाच्या राष्ट्रीय ई प्रशासनाशी तंत्र विषयक भागीदारी करत  देखो अपना देश वेबिनार मालिका सादर करण्यात येत आहे. वेबिनारची सत्रे  https://www.youtube.com/channel/UCbzIbBmMvtvH7d6Zo_ZEHDA/featured वर उपलब्ध आहेत तसेच पर्यटन मंत्रालयाच्या सोशल मिडिया हॅन्डल वरही उपलब्ध आहेत. 

यापुढचा वेबिनार 19 सप्टेंबर 2020 ला सकाळी अकरा वाजता होणार आहे. त्यासाठी https://digitalindiagov.zoom.us/webinar/register/WN_6ydAovSPQtaSCTwzaaNwtw इथे आधी नोंदणी करायची आहे.

 

M.Chopade/N.Chitale/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1654005) Visitor Counter : 221