आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

खाजगी रुग्णालयांबरोबरच्या व्हर्च्युअल परिषदेत आरोग्य मंत्रालयाने राष्ट्रीय वैद्यकीय उपचार प्रोटोकॉल आणि सर्वोत्तम पद्धतींचे पालन करण्यावर दिला भर


रूग्णांना अडचणींशिवाय प्रवेश सुनिश्चित करण्याचे रुग्णालयांना केले आवाहन

Posted On: 12 SEP 2020 6:44PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  12 सप्टेंबर  2020

 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने फिक्की  आणि एम्स, नवी दिल्ली यांच्या सहकार्याने देशात कोविड -19 उपचार देणाऱ्या खासगी रुग्णालयांसाठी व्हर्च्युअल परिषदेचे आयोजन केले होते. यामुळे टाळता येण्याजोगे मृत्यू कमी करण्यासाठी क्लिनिकल प्रोटोकॉल आणि कोविड -19 व्यवस्थापनातील सर्वोत्तम  पद्धतींविषयी चर्चा करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध झाले. 

कोविड -19 ने देशाच्या आरोग्य यंत्रणेसमोर अभूतपूर्व आव्हाने निर्माण केली असताना सरकारकडून तसेच खासगी उद्योगांकडूनही सक्रिय प्रतिसाद मिळत आहे.  देशातील सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील रुग्णालयांद्वारे राबविल्या जाणाऱ्या सर्वोत्तम पद्धती आणि प्रभावी उपचार पद्धती सामायिक करण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. मंत्रालयाने रुग्णालय प्रतिनिधींना  कोविड-19  चे व्यवस्थापन करताना त्यांच्या सुविधांमध्ये त्यांना भेडसावणाऱ्या प्रमुख  समस्या आणि आव्हाने सामायिक करण्यासाठी प्रोत्साहित केले.

केंद्रीय आरोग्य सचिवांनी व्हर्चुअल  परिषदेचे उद्‌घाटन केले. कोविड -19 रूग्णाला बेड नाकारू नये आणि तातडीने उपचार पुरवावेत या सरकारच्या निर्धाराचा त्यांनी पुनरुच्चार केला.  किफायतशीर, परवडणारी आणि सर्वांना सहज उपलब्ध असणारी आरोग्य यंत्रणा हे सामूहिक उद्दिष्ट असायला हवे. राज्य / केंद्रशासित प्रदेश सरकारसमवेत केंद्राचे उद्दीष्ट मृत्युदर 1% पेक्षा खाली आणणे हे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. विविध राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमधील आयसीयू डॉक्टरांच्या क्लिनिकल व्यवस्थापन क्षमता वाढवण्यासाठी  ई-आयसीयू, सेंटर्स ऑफ एक्सलन्स (सीओई) आणि क्लिनिकल ग्रँड राउंडद्वारे  एम्स, नवी दिल्ली यांनी आयोजित केलेल्या दूरध्वनी-सल्ला मसलत सत्राची चर्चा यांचा सर्वोत्तम पद्धतीत समावेश होता. केली होती. याशिवाय प्रतिबंध, लवकर निदान , प्रतिबंध यासारख्या इतर केंद्रित रणनीतीमुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आणि मृत्युदर कमी होत गेला.

बैठकीदरम्यान, इतर गंभीर आजार असलेल्या रूग्णांवर वेळेवर उपचार करण्याच्या महत्वावर भर देण्यात आला. संसर्ग प्रतिबंध आणि नियंत्रणावरील सर्व पद्धतींचा अवलंब करुन आरोग्य कर्मचार्‍यांचे मनोबल कायम राखत त्यांचे रक्षण करण्यासाठी रुग्णालयांना प्रोत्साहन देण्यात आले. रुग्णालयांनाही रूग्णांना अडचणीशिवाय प्रवेश निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले. कोविड -19  रूग्णांवरील उपचारांमध्ये पुरावा-आधारित उपचार  प्रोटोकॉलचे महत्त्व आणि उपचारांमधील विषमता कमी करण्याचे महत्वही अधोरेखित केले गेले.

खासगी क्षेत्रातील रूग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांनीही कोविड -19  विरूद्ध त्यांच्या लढाईबद्दलचे अनुभव आणि आव्हाने याबाबत माहिती दिली.  खाजगी रुग्णालयांतर्फे सुविधा-स्तरावरील नियमित देखरेख  आणि द्वितीय व तृतीय श्रेणीच्या शहरांमध्ये रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना मदत करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर यासह अनेक चांगल्या पद्धती सामायिक केल्या गेल्या. आरोग्य विम्याच्या अभावामुळे आर्थिक भार आणि छोट्या सुविधांमुळे होणाऱ्या विलंबासंदर्भात  चर्चा झाली. या परिषदेला देशभरातील 150 हून अधिक रुग्णालय प्रतिनिधी, वरिष्ठ डॉक्टर  उपस्थित होते.

आयसीएमआरचे महासंचालक प्रा  बलराम भार्गव, एम्सचे संचालक डॉ रणदीप गुलेरिया, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे  संयुक्त सचिव लव अग्रवाल, फिक्कीचे अध्यक्ष   आणि अपोलो रुग्णालयाचे संयुक्त महासंचालक डॉ. संगिता रेड्डी, अध्यक्ष, फिक्की आरोग्य सेवा समितीचे अध्यक्ष डॉ. आलोक रॉय, आणि  मेडिका ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सचे अध्यक्ष यावेळी उपस्थित होते.

 

R.Tidke/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1653654) Visitor Counter : 206